Join us  

IND vs NED: सगळं छान चाललंय पण... नेदरलँड्सचे 'हे' 3 खेळाडूं भारतासाठी ठरू शकतात 'डेंजर झोन'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:35 PM

Open in App
1 / 6

Rohit Sharma Team India, IND vs NED World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक २०२३ च्या शेवटच्या साखळी टप्प्यातील सामन्यासाठी बेंगळुरूला पोहोचला आहे. रविवारी, १२ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताचा सामना नेदरलँडशी होणार आहे.

2 / 6

भारतीय संघाने आतापर्यंत सलग आठ सामने जिंकले आहेत. एकही सामना हरलेल्या टीम इंडियाला शेवटचा सामनाही जिंकून उपांत्य फेरीत जायची इच्छा आहे. मात्र, नेदरलँडला पराभूत करणे इतके सोपे नसेल हे भारतीयांना समजून घ्यावे लागेल.

3 / 6

डच संघाने या विश्वचषकात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी धरमशालामध्ये फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मोठा अपसेट केला. त्यामुळे भारतालाही या संघातील ३ मॅचविनर खेळाडूंपासून थोडंसं जपून राहावं लागेल.

4 / 6

लोगान व्हॅन बीक- नेदरलँड्सचा वेगवान गोलंदाज लोगान व्हॅन बीक भारतासाठी धोका ठरू शकतो. या विश्वचषकात त्याने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. व्हॅन बीकने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण १२ विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्धही तो काही बड्या विकेट्स घेऊ शकतो.

5 / 6

बास डी लीड- गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या बास डी लीडेचे नावही या यादीत आहे. तोदेखील भारतीय खेळाडूंना अडचणीत आणू शकतो. झंझावाती फलंदाजीसोबतच तो त्याच्या बेफाम गोलंदाजीसाठीही ओळखला जातो. तो एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद त्याच्यात आहे.

6 / 6

स्कॉट एडवर्ड्स- नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स भारतीय क्रिकेट संघासाठी मोठा धोका बनू शकतो. बेंगळुरूमध्ये फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर तो भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणू शकतो. एडवर्ड्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धरमशाला येथे नाबाद ७८ धावांची अप्रतिम खेळी खेळली होती. एडवर्ड्सने या विश्वचषकात आतापर्यंत २४२ धावा केल्या आहेत.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका