Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिनला क्लीन बोल्ड करणारा नामिबियाचा 'डॉक्टर' क्रिकेटर... रुडी वुरेन बद्दलच्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:46 IST

Open in App
1 / 7

टीम इंडियाचा आजचा सामना नामिबियाविरुद्ध आहे. आयसीसी स्पर्धेत या दोन्ही संघांमधील हा तिसरा सामना आहे. याआधी २००३ वनडे वर्ल्डकप आणि २०२१ टी२० वर्ल्डकपमध्ये दोन संघ खेळले आहेत.

2 / 7

भारताने आतापर्यंत दोन्ही वेळा नामिबियाला हरवले आहे. पण २००३ साली सचिन तेंडुलकरची विकेट घेऊन लोकप्रिय होणाऱ्या नामिबियाच्या एका डॉक्टरची सध्या चर्चा आहे. त्याचे नाव रुडी व्हॅन वुरेन.

3 / 7

नामिबियाचे रुडी व्हॅन वुरेन हे क्रिकेटर, डॉक्टर, वन्यजीव रक्षक, रग्बी खेळाडू आहेत. पण मुख्य म्हणजे, ५३ वर्षीय वुरेन हे नामिबिया क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आहेत. देशात क्रिकेट वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

4 / 7

वुरेन यांनी दक्षिण आफ्रिकेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष हेज गीनगोब यांचे ते वैयक्तिक डॉक्टर होते. २००० मध्ये त्यांनी पर्यावरणवादी विचारवंत मार्लीस यांच्याशी लग्न केले.

5 / 7

वुरेन यांची खरी लोकप्रियता तेव्हा वाढली जेव्हा त्यांनी २००३च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरला क्लीन बोल्ड केले. २००३ च्या क्रिकेट विश्वचषकात सचिन तेंडुलकरची विकेट घेऊन ते लोकप्रिय झाले.

6 / 7

नामिबियाविरुद्ध १५२ धावांची खेळी केल्यावर सचिन थकला होता. तेव्हा वुरेनने सचिनला बाद केले. सचिनसोबतच त्याने सेहवागलाही बाद केले होते. त्या सामन्यात त्याने ५३ धावांत दोन बळी घेतले होते.

7 / 7

त्या विश्वचषकानंतर, वुरेन पुन्हा नामिबियासाठी खेळले नाहीत. पण क्रिकेटसाठी काम करत राहिले. त्यामुळेच आता भारत-नामिबिया पुन्हा आमनेसामने असताना वुरेन नामिबिया क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्डराष्ट्राध्यक्षडॉक्टर