Join us

IND vs ENG : शुबमन गिलसह टीम इंडियातील या ६ खेळाडूंकडे इंग्लंड दौरा अविस्मरणीय करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:06 IST

Open in App
1 / 8

इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत नवा कर्णधार शुबमन गिलसह टीम इंडियाच्या ताफ्यातील ६ स्टार खेळाडूंना अविस्मरणीय कामगिरी करण्याची संधी आहे.

2 / 8

इथं एक नजर टाकुयात भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत कोणत्या खेळाडूला कोणता विक्रम खुणावतोय यासंदर्भातील सविस्तर माहिती

3 / 8

भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल कसोटीत २००० धावा करण्यापासून फक्त १०७ धावा दूर आहे. आतापर्यंत ३२ सामन्यात त्याने ५ शतके आणि ७ अर्धशतकासह १८९३ धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये त्याची कामगिरी खराब राहिली आहे. इंग्लंडच्या मैदानात त्याने ६ डावात फक्त ८८ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. कसोटीत मोठा टप्पा गाठत हा विक्रम सुधारण्याची त्याच्याकडे नामी संधी असेल.

4 / 8

यशस्वी जैस्वालही कसोटीत २००० धावांच्या जवळ पोहचलाय. यासाठी त्याला २०२ धावा कराव्या लागतील. हा टप्पा गाठण्यासाठी कसोटीत सर्वात जलदगतीने ५० षटकार पूर्ण करण्याचा शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याचीही त्याच्याकडे संधी असेल.

5 / 8

लोकेश राहुलने आतापर्यंत २१५ आंतरराष्ट्रीय सामन्यात ८५६५ धावा केल्या आहेत. या दौऱ्यावर त्याला ९ हजार धावांचा पल्ला गाठणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील होण्याची संधी आहे.

6 / 8

भारतीय संघाचा उप कर्णधार रिषभ पंत ५२ धावा करताच तो कसोटीत ३००० धावांचा आकडा पार करेल. इंग्लंडमध्ये त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

7 / 8

रविंद्र जाडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७००० धावांचा पल्ला गाठण्याची संधी आहे. यासाठी त्याला ३०९ धावा कराव्या लागतील. बॅटिंगशिवाय बॉलिंगमध्येही त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.

8 / 8

मोहम्मद सिराज आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सच द्विशतक पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला इंग्लंड दौऱ्यावर १५ विकेट्स घ्याव्या लागतील.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५शुभमन गिललोकेश राहुलरिषभ पंतयशस्वी जैस्वालमोहम्मद सिराजरवींद्र जडेजा