मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात लोकेश राहुलनं आपला क्लास दाखवत इंग्लंडच्या मैदानात कसोटीत १०० धावांचा पल्ला गाठला.
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये हा टप्पा गाठणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या कामगिरीसह त्याने खास क्लबमध्ये एन्ट्री मारलीये.
इथं एक नजर टाकुयात इंग्लंडच्या मैदानात १००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर
क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम प्रस्थापित करत विक्रमादित्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने इंग्लंडच्या मैदानात भारताकडून सर्वाधिक १५७५ धावा केल्या आहेत.
या यादीत राहुल द्रविड दुसऱ्या स्थानावर आहे. मध्यफळीतील जबाबदारी बजावताना राहुल द्रविडनं इंग्लंडच्या मैदानात १३७६ धावा काढल्या आहेत.
लिटल मास्टर सुनील गावसकर या यादीत ११५२ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. सलामीवीराच्या रुपात इंग्लंडच्या मैदानाशिवाय वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानच्या मैदानात १०० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
विराट कोहलीनं आपल्या कसोटी कारकिर्दीत ३३.२१ च्या सरासरीसह इंग्लंडच्या मैदानात १०९६ धावा केल्या आहेत.
लोकेश राहुलनं विराटपेक्षाही उत्तम सरासरीसह (४२.८३) इंग्लंडमध्ये हजार धावांचा पल्ला गाठला आहे.