मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या इंग्लंडचा फलंदाज जो रुटनं टीम इंडियाविरुद्धच्या मँचेस्टर कसोटी सामन्यात मोठा डाव साधला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि भारताचा माजी क्रिकेटर राहुल द्रविडला मागे टाकत तो तिसऱ्या स्थानावर पोहचलाय.
कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता फक्त सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग हे दोघेच रुटच्या पुढे आहेत. इथं एक नजर टाकुयात कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांच्या रेकॉर्डवर
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने १६८ कसोटी सामन्यात ४१ शतके आणि ६२ अर्धशतकांच्या जोरावर १३ हजार ३७८ धावा केल्या आहेत.
कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांच्या यादीत जो रुट हा एकमेव सक्रीय खेळाडू असून १५७ व्या सामन्यात त्याने १३२९०* धावा केल्या आहेत. यात त्याने ३७ शतकासह ६६ अर्धशतके झळकावली आहेत. आता रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड त्याच्या निशाण्यावर आहे.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १६६ सामन्यात ४५ शतके आणि ५८ अर्धशतकाच्या मदतीने १३ हजार २८९ धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १६६ सामन्यात ४५ शतके आणि ५८ अर्धशतकाच्या मदतीने १३ हजार २८९ धावा केल्या आहेत.