IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!

India Tour Of England: इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे.

इंग्लंडमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये कर्णधार शुभमन गिल अव्वल स्थानावर आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये त्याने आतापर्यंत ३ सामन्यांच्या ६ डावात ६०७ धावा केल्या आहेत. या मालिकेतील अजून दोन सामने खेळायचे आहेत.

इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे. २००२ मध्ये त्याने ६ डावात १००.३ च्या सरासरीने ६०२ धावा केल्या.

या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यात त्याने १० डावांमध्ये ५९.३ च्या सरासरीने ५९३ कसोटी धावा केल्या.

इंग्लंडमध्ये एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत सुनील गावस्कर चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी १९७९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ७ डावात ७७.४ च्या सरासरीने ५४२ धावा केल्या.

इंग्लंडमधील एकाच कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांमध्ये राहुल द्रविडचे नाव दोन वेळा आहे. २०११ मध्ये त्याने ८ डावात ७६.७ च्या सरासरीने ४६१ धावा केल्या.