भारताचा अनुभवी फलंदाज करुण नायर याने लंडन येथील ओव्हलच्या मैदानात तब्बल ३ हजार १४९ दिवसांच्या अंतराने कसोटी क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली.
डिसेंबर २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात त्याच्या भात्यातून ३०३ धावांची नाबाद खेळी आली होती.
इंग्लंड दौऱ्यावर ८ वर्षांनी कमबॅकची संधी मिळाल्यावर ३ सामन्यातील ६ डावातील अपयशानंतर त्याने सातव्या डावात अर्धशतकी डाव साधला.
पण तुम्हाला माहितीये का? भारताकडून कसोटीत मोठ्या अंतराने फिफ्टी प्लस धावा करण्याचा रेकॉर्ड हा काही करुण नायरच्या नावे नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक कालावधीनंतर ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा रेकॉर्ड हा माजी विकेट किपर बॅटर पार्थिव पटेलच्या नावे आहे.
पार्थिव पटेल याने २००२ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी न्यू वंडर्सच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते.
कसोटीत पदार्पण केल्यावर २ वर्षांनी म्हणजे २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात ५४ धावांची खेळी केल्यावर २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्याच्या भात्यातून फिफ्टी प्लस धावसंख्या पाहायला मिळाली होती. या सामन्यात त्याने ६७ धावा केल्या होत्या. तब्बल ४ हजार ४२६ दिवसांच्या अंतराने त्याने हा डाव साधला होता.