Join us

IND vs ENG 5th Test : ओव्हलच्या मैदानात कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? बॅटिंग-बॉलिंगमध्ये कुणी सोडलीये छाप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:30 IST

Open in App
1 / 8

भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडन येथील ओव्हलच्या मैदानात आतापर्यंत १४ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील २ सामन्यातील विजयासह ५ पराभव अन् ७ सामने अनिर्णित राहिले आहेत.

2 / 8

ओव्हलच्या मैदानात १९७१ मध्ये पहिला कसोटी सामना जिंकल्यावर तब्बल ५० वर्षांनी २०२१ मध्ये टीम इंडियाने या मैदानात दुसरा विजय नोंदवला होता.

3 / 8

१९७१ मध्ये या मैदानात मिळालेल्या पहिल्या विजयात सुनील गावसकर यांनी २२१ धावांशिवाय केल्या होत्या. गोलंदाजीत भागवत चंद्रशेखर या फिरकीपटूनं ३८ धावा खर्च करत ६ विकेट्सचा डाव साधला होता.

4 / 8

भारतीय संघाने इंथ २०२१ च्या दौऱ्यात अखेरचा कसोटी सामना जिंकला. या सामन्यात रोहित शर्माचं परदेशातील पहिले शतक आणि शार्दुल ठाकूरच्या दोन अर्धशतकांशिवाय गोलंदाजीत उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

5 / 8

इंग्लंडच्या मैदानात भारतीय संघाने एक तटस्थ सामनाही खेळला आहे. २०२३ मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनल लढत इथंच झाली होती. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

6 / 8

ओव्हलच्या मैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविड सर्वात आघाडीवर आहे. त्याने या मैदानात ३ सामन्यातील ५ डावात ११०.७५ च्या सरासरीसह दोन शतकांच्या मदतीने ४०० धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

7 / 8

सक्रीय खेळाडूंमध्ये लोकेश राहुल हा ओव्हलच्या मैदानातील यशस्वी फलंदाज आहे. २०१८ आणि २०२१ च्या दौऱ्यातील २ सामन्यातील ४ डावात केएल राहुलनं या मैदानात २४९ धावा केल्या आहेत. २०१८ च्या दौऱ्यात त्याच्या भात्यातून या मैदानात १४९ धावांची सर्वोच्च खेळी पाहायला मिळाली होती.

8 / 8

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडलोकेश राहुलरवींद्र जडेजाराहुल द्रविडसुनील गावसकररोहित शर्माशार्दुल ठाकूर