Join us  

IND vs ENG, 1st T20I : लोकेश राहुलला नेमकं खेळवायचं कुठे?; Playing XI निवडताना विराट कोहलीची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 11:59 AM

Open in App
1 / 8

India Playing XI 1st T20 – India vs England T20 Series: भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका १२ मार्चपासून सुरू होणार आहे. टी नटराजन दुखापतीतून अजूनही सावरलेला नाही, वरुण चक्रवर्थी व राहुल टेवाटिया यांना फिटनेस टेस्टमध्ये अपयश आले आणि त्यामुळे त्यांचे या मलिकेत खेळणे अनिश्चित आहे.

2 / 8

त्यात आहे त्या खेळाडूंमधून Playing XI निवडताना विराट कोहलीची कसोटी लागणार आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) ट्वेंटी-20 संघात परतला आहे, तर रिषभ पंतनंही ( Rishabh Pant) कामगिरीच्या जोरावर कमबॅक केले आहे. त्यामुळे लोकेश राहुलला ( KL Rahul’s position in the Indian XI?) अंतिम ११ खेळाडूंमध्ये नेमके खेळवायचे कुठे?, रिषभच्या पुनरागमनानं राहुलचे प्लेइंग इलेव्हन ( India XI) स्थान डळमळीत झाले आहे.

3 / 8

मागील काही सामन्यांमध्ये लोकेश राहुल यष्टिरक्षक-फलंदाज अशा दुहेरी भूमिकेत दिसला होता, परंतु रिषभच्या पुनरागनानं त्याचं यष्टिंमागील स्थान जाणार आहे. त्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा या जोडीला सलामीसाठी प्राधान्य असेल, हे जगजाहीर आहे.

4 / 8

अशात राहुलला कोणत्या क्रमांकावर संधी मिळेल, याची चाचपणी सुरू झाली आहे. विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून धवननं १५०+ धावा केल्या आहेत. रोहितच्या समावेशाबद्द चर्चा होऊच शकत नाही. त्यामुळे राहुलला सलामीला संधी मिळणे अवघड आहे. धवन मधल्या फळीत खेळण्याची शक्यता कमीच आहे.

5 / 8

विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांचे नाव चर्चेत आहे. तर पाचव्या व सहाव्या क्रमांकावर रिषभ व हार्दिक पांड्या हे खेळतील. कर्नाटकचा फलंदाज राहुलसमोर मुंबईच्या अय्यर व यादवचे आव्हान आहे. अशात या तिघांपैकी केवळ एकच जण अंतिम ११मध्ये स्थान पटकावू शकतो.

6 / 8

गोलंदाजी विभागातही चढाओढ India Playing XI 1st T20 – भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनानं गोलंदाजी विभागातही चढाओढ पाहायला मिळेल. दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर यांच्यापैकी एक जण अंतिम ११मध्ये एन्ट्री करेल. युजवेंद्र चहर, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे तिघेही प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळतील.

7 / 8

भारत ( India’s T20I squad ) - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

8 / 8

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडलोकेश राहुलरोहित शर्माशिखर धवनविराट कोहलीसूर्यकुमार अशोक यादवरिषभ पंतहार्दिक पांड्याभुवनेश्वर कुमारयुजवेंद्र चहलवॉशिंग्टन सुंदरअक्षर पटेलशार्दुल ठाकूर