Join us

Rohit Virat Ashwin, IND vs BAN: कसोटी मालिकेत टीम इंडिया करणार ५ मोठ्ठे विक्रम! रोहित, विराट, अश्विनला सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 19:58 IST

Open in App
1 / 6

IND vs BAN Test Series: भारत-बांगलादेश यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तानला त्यांच्याच घरात पराभूत करणाऱ्या बांगलादेश विरूद्ध रोहित शर्माची टीम इंडिया उतरणार आहे. या मालिकेत पुढील ५ विक्रम होण्याची दाट शक्यता आहे.

2 / 6

Virat Kohli: विराट कोहलीने (८,८४८ कसोटी धावा) बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत १५२ धावा केल्यास तो ९,००० धावांचा टप्पा पार करेल. असा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय ठरेल. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांनी ही किमया साधली आहे.

3 / 6

Rohit Sharma: रोहित शर्माने बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण ७ षटकार मारल्यास तो महान भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडेल. सेहवागने १०३ कसोटींमध्ये ९० षटकार ठोकले होते. रोहित शर्माने आतापर्यंत ५४ कसोटींमध्ये ८४ षटकार मारले आहेत.

4 / 6

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीची नजर डॉन ब्रॅडमनच्या विक्रमावर असेल. विराटची २९ कसोटी शतके आहेत. ब्रॅडमन यांचाही २९ शतकांचा विक्रम आहे. त्यांचा विक्रम मागे टाकण्यापासून विराट फक्त एकच शतक दूर आहे.

5 / 6

R Ashwin: रवीचंद्रन अश्विनला या कसोटी मालिकेत झहीर खानचा विक्रम मोडण्याची संधी आहे. झहीर खान हा भारत-बांगलादेश कसोटींमध्ये सर्वाधिक विकेट (३१) घेणारा गोलंदाज आहे. अश्विनने आतापर्यंत २३ बळी घेतले आहेत. ९ बळी घेतल्यास तो नवा विक्रम रचेल.

6 / 6

Cheteshwar Pujara: चेतेश्वर पुजाराने बांगलादेशविरुद्ध ५ कसोटींध्ये ४६८ धावा केल्यात. राहुल द्रविडने ७ कसोटींमध्ये ५६० धावा केल्यात. विराटच्या नावावर ६ कसोटींमध्ये ४३७ धावा आहेत. विराटने ३२ धावा केल्यास तो पुजाराला मागे टाकेल. तर १२४ धावा करून द्रविडला मागे टाकेल.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीरोहित शर्माआर अश्विन