IND vs AUS: पत्रकार परिषदेत रोहित शर्मा संतापला; ऑस्ट्रेलियन मीडियाच्या आरोपांवर दिले चोख उत्तर

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियन मीडियाने टीम इंडियावर नागपूरमधील खेळपट्टीशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.

Rohit Sharma Press Conference: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) पहिला सामना नागपुरात विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणार आहे.

ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत खेळपट्टीबाबत(पिच) उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना चोख उत्तर दिले.

वादावर रोहित शर्माचे चोख उत्तर- ऑस्ट्रेलियन मीडियाने टीम इंडियावर खेळपट्टीशी छेडछाड केल्याचा किंवा अयोग्य पद्धतीने खेळपट्टी तयार केल्याचा आरोप केला आहे. रोहित शर्माने मीडियाशी बोलताना या वादावर मोठं वक्तव्य केलं.

तो म्हणाला, 'आमचे लक्ष खेळावर आहे, ऑस्ट्रेलियन मीडियाच्या बोलण्यावर नाही. तुम्ही चांगली तयारी केली तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. खेळपट्टीकडे पाहू नका, क्रिकेटवरही लक्ष केंद्रित करा. नागपूरमध्ये फक्त चांगले खेळून चालणार नाही, तर सर्वच खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करावी लागेल.'

ऑस्ट्रेलियन मीडियाचे काय आरोप ?- नागपूरच्या खेळपट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही खेळपट्टी पाहता डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध फिरकीपटूंना ही खेळपट्टी मदत करू शकते, असे दिसते. ऑस्ट्रेलियन मीडियाने या खेळपट्टीची छायाचित्रे शेअर केली आणि खेळपट्टीशी छेडछाड केल्याचा आरोप केला.

भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलियन संघ- पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) , मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर.