क्रिकेटप्रेमींकडून सोशल मीडियावर मिम्स व्हायरल करून भारतीय संघाच्या सुमार कामगिरीची खिल्ली उडवली जात आहे. त्यातील काही निवडक मिम्स...
भुवनेश्वर कुमारला १९ वं षटक दिल्यावर अशी अवस्था होते
टीम इंडियाच्या फॅन्सची पहिला डाव आणि दुसऱ्या डावानंतरची अवस्था
भारतीय संघाची गोलंदाजी पाहिल्यावर भारतीय क्रिकेट संघाच्या फॅन्सची प्रतिक्रिया
मॅथ्यू वेडची फटकेबाजी पाहिल्यावर पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींची प्रतिक्रिया
शेवटच्या षटकांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलला धावांचा बचाव करण्यास सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया.
महागड्या गोलंदाजीमुळे भुवनेश्वर कुमारचा दिंडा अॅकॅडमीमध्ये समावेश
आशिया चषकाचीच क्षणचित्रे पाहत असल्याची चाहत्यांची प्रतिक्रिया
आजच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताच्या स्वैर माऱ्याचा फायदा उठवत ऑस्ट्रेलियाने सामन्यात ४ विकेट्सनी बाजी मारली.
या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली आजच्या सामन्यात काही विशेष चमक दाखवू शकले नाहीत. मात्र लोकेश राहुलचे अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने दोनशेपार मजल मारली होती.