Join us  

Virat Kohli: "शतक डोक्यात नव्हतं तरीपण मागं लागलं होतं", विराटनं द्रविडला सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 3:34 PM

Open in App
1 / 10

भारतीय संघाने सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची मालिका आपल्या नावावर केली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील 2 सामने जिंकून यजमान भारताने 2-1 ने मालिकेवर कब्जा केला.

2 / 10

3 सामन्यांमधील 2 सामन्यांत यजमान भारताने तर एका सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवला. काल झालेला अखेरचा सामना अनिर्णित झाल्याने भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब झाला.

3 / 10

चौथ्या सामन्यात भारताकडून शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी शतक झळकावले. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ज्या प्रकारे त्याच्या फिटनेसबद्दल जागरूक आहे, यातून इतर युवा खेळाडूंना खूप शिकण्यासारखे आहे.

4 / 10

अहमदाबादच्या सोप्या खेळपट्टीवर धावा काढण्यासाठी कठीण परिस्थितीत संयम दाखवत कोहलीने 186 धावांची शानदार खेळी केली. खरं तर किंग कोहलीने तब्बल 1205 दिवसांनंतर त्याचे कसोटीमध्ये शतक झळकावले.

5 / 10

या सामन्यानंतर विराटने बीसीसीआय टीव्हीवर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी संवाद साधला. द्रविड यांच्याशी संवाद साधताना विराटने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. बचाव करणे ही आपली सर्वात मजबूत बाजू असल्याचे कोहलीने यावेळी सांगितले.

6 / 10

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि विराटला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. प्रशिक्षक द्रविड यांच्याशी बोलताना विराटने म्हटले, 'या खेळीपूर्वीही मी या मालिकेत चांगला खेळलो आहे, हे मला माहीत होते. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी खरोखरच चांगली होती, पण चेंडू सॉफ्ट होता त्यामुळे चौकार मारणे इतके सोपे नव्हते.'

7 / 10

'मला माझ्या बचाव करण्याच्या खेळीवर विश्वास ठेवावा लागला. कसोटी क्रिकेट खेळताना नेहमीच माझी ही पद्धत राहिली आहे. मी प्रत्येक सत्रात 30 धावा काढण्याचा प्रयत्न केला आणि मला माहित होते की सहा सत्रांनंतर इथे 150 धावा करता येतील. तुमची तंदुरुस्ती आणि शारीरिक तयारी इथेच कामाला येत असते.'

8 / 10

मुलाखतीदरम्यान, राहुल द्रविड यांनी विराटचे कौतुक केले पण दीर्घकाळ कसोटी शतक न झळकावल्यामुळे या गोष्टी मनात घुमत राहिल्या का, असा प्रश्नही केला. यावर कोहली म्हणाला, 'कुठेतरी शतक न केल्याने तुम्हाला फलंदाज म्हणून आणखी काही करण्याची प्रेरणा मिळते. काही प्रमाणात, मी या गोष्टींना माझ्यावर वर्चस्व गाजवू दिले. पण मला संघासाठी धावा करायच्या आहेत. मला माहित आहे की 40-45 धावांनंतर मी 150 धावा करण्याकडे पाहतो, जेणेकरून मी माझ्या संघासाठी शक्य तितके योगदान देऊ शकेन.

9 / 10

विराट कोहलीने सांगितले की, शतक न ठोकल्यामुळे मला त्रास झाला नाही. कारण मी कोणत्या विक्रमासाठी कधीच खेळत नाही. पण संघासाठी अधिक योगदान देऊ शकत नव्हतो त्यामुळे कुठेतरी व्यथित झालो होतो. जेव्हा तुम्ही संघाला खूप काही देण्याच्या भावनेने खेळता तेव्हा शतके आपोआप येतात.

10 / 10

'संघाला मदत न करणे अधिक क्लेशदायक आहे. कारण शतके स्वतःहून येत राहतात. मात्र, हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडताच जेव्हा लोक शतकाविषयी विचारतात, तेव्हा नको ते सुद्धा मनात धावू लागते की मला शतक करायचे आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी शतक झळकावल्याचा मला आनंद आहे', असे कोहलीने अधिक म्हटले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीराहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App