भारतात कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा १९९९नंतरचा उस्मान ख्वाजा तिसरा पाकिस्तानातील जन्मलेला खेळाडू ठरला. यापूर्वी १९९९ साली सईद अन्वर व शाहिद आफ्रिदी यांनी अनुक्रमे कोलकाता व चेन्नई कसोटीत असा पराक्रम केला होता. उस्मान ख्वाजाच्या या शतकाचा पाकिस्तानीही जल्लोष करताना दिसत आहेत.
या शतकानंतर उस्मान ख्वाजा भावुक झाला. तो म्हणाला,''हे शतक माझ्यासाठी खूप खास आहे. मी यापूर्वी दोन वेळा भारत दौऱ्यावर आलो आणि दोन्ही वेळेस मला सर्वच्या सर्व ८ कसोटींत पाणी देण्याचं काम दिलं गेलं. हा खूप मोठा प्रवास होता आणि अखेरीस मी भारतात शतक झळकावले. एक ऑस्ट्रेलियन म्हणून मला या खेळीचा अभिमान आहे.''
उस्मान ख्वाजाचा जन्म १८ डिसेंबर १९८६ मध्ये पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे झाला. तो चार वर्षांचा असताना कुटुंबियांनी न्यू साऊथ वेल्स येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा पाकिस्तानी वंशाचा तो पहिलाच खेळाडू ठरला.
उस्मान ख्वाजाने २०१०-११ मध्ये अॅशेस मालिकेतून ऑस्ट्रेलिया संघाकडून पदार्पण केले. तो एक पात्र व्यावसायिक आणि इन्स्ट्रुमेंट-रेट असलेला पायलट आहे.
त्याने न्यू साउथ वेल्स विद्यापीठातून वैमानिकाची पदवी पूर्ण केली आहे. त्याने पायलट परवाना प्राप्त केला होता. त्याचे शिक्षण वेस्टफिल्ड स्पोर्ट्स हायस्कूलमध्ये झाले.
पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटर उस्मान ख्वाजाने २०१८ साली त्याची गर्लफ्रेंड रेचेल मॅकक्लेननशी लग्न केले. तेव्हा रेचलने धर्मांतर केले होते.
रेचलने लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारला होता, त्यानंतर दोघांनीही इस्लामिक रितीरिवाजानुसार लग्न केले होते. राहेल ही कॅथोलिक ख्रिश्चन आहे, ख्वाजापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे.
२०१६ मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली होती. ख्वाजा आणि रेचल यांना एक मुलगी आहे.