Join us

Virat Kohli Record, IND vs AUS 1st test: 'किंग कोहली' केवळ ६४ धावा दूर, Sachin Tendulkar च्या पराक्रमाशी करणार बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 09:19 IST

Open in App
1 / 7

Virat Kohli Record, IND vs AUS 1st test: टीम इंडियाचा 'रनमशिन' विराट कोहली याने आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत धमाकेदार खेळी करत भरपूर धावा केल्या आहेत. हल्ली विराट कोहली जेव्हा मैदानात येतो तेव्हा त्याच्या बॅटमधून नवनवीन विक्रम घडतात.

2 / 7

विराटच्या दमदार खेळीचा अनुभव संपूर्ण जगाने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही असेच काही घडू शकते.

3 / 7

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीने जर ६४ धावा केल्या, तर तो एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल.

4 / 7

विराट कोहलीच्या नावावर सध्या २४,९३६ आंतरराष्ट्रीय धावा आहेत. कोहलीने ६४ धावा करताच तो करिअरमधील २५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करेल.

5 / 7

भारताचा माजी कर्णधार असलेला विराट कोहली याच्या नावे सध्या ४९० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७४ शतके आणि १२९ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने नागपुरात ६४ धावा केल्या तर सचिन तेंडुलकरनंतर २५ हजार धावा करणारा तो दुसरा भारतीय ठरेल.

6 / 7

सध्या एकही क्रिकेटपटू कोहलीच्या आसपास नाही. सक्रिय खेळाडूंद्वारे सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहलीच्या खालोखाल इंग्लंडचा जो रूट आहे. त्याने ३१७ सामन्यात १७,७२९ धावा केल्या आहेत.

7 / 7

जगात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली सहाव्या स्थानावर आहे. सर्वाधिक 34357 धावा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. यानंतर कुमार संगकारा (28016), रिकी पाँटिंग (27483), महेला जयवर्धने (25957), जॅक कॅलिस (25534) आणि विराट कोहली यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीसचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघ
Open in App