भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा वेगवेगळ्या हेअरस्टाइलमध्ये कसा दिसतो, हे या फोटोमधून दाखवण्यात आले आहे.
सचिनचा हा फोटो तुम्ही या पूर्वी पाहिला नसेल. हा फोटो आहे पाकिस्तानमधला. 1989 साली भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी एका पार्टीसाठी सचिनने असा भन्नाट लूक केला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे युद्ध. त्यामुळे भारताचा कर्णधार सौरव गांगुली आणि इंझमाम उल हक यांचा या पेहरावातील फोटो चांगलाच वायरल झाला होता. 2005 साली पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. तेव्हा हा फोटो वायरल झाला होता.
आतापर्यंत बऱ्याचदा तुम्ही राहुल द्रविडला पाहिले आहे. पण द्रविडने कधी मिशी ठेवलेली तुम्ही पाहिली का? पण या फोटोमध्ये मात्र द्रविडने मिशी ठेवल्याचे दिसत आहे.
रवींद्र जडेजा हा एक घोडेस्वारदेखील आहे. जडेजाने तीन घोडे आपल्या घरी ठेवले आहेत. या तिन्ही घोड्यांचे स्वभाव कसे भारतीय खेळाडूंशी जुळतात, याचाही उल्लेख जडेजाने केला आहे.
विराट कोहली, इशातं शर्मा, रवींद्र जडेजा हे तिघे भारताच्या 19-वर्षांखालील संघातून एकत्र खेळले होते. पण या तिघांचा एत्रतिकपणे काढलेला हा एकमेव फोटो असल्याचे म्हटले जात आहे.