यंदाच्या विश्वचषकात धुमाकुळ घातला तो भारताचा सलामीवीर रोहित शर्माने. रोहितने यंदाच्या विश्वचषकात पाच शतके झळकावत इतिहास रचला.
रोहितने या विश्वचषकात चारवेळा सामनावीराचा पुरस्कार पटकवला. त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा मानही रोहितला मिळाला.
बांगलादेशचा अष्टपैलू शकिब अल हसनने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्रिकेट जगताला आपली दखल घ्यायला भाग पाडले.
शकिबने या विश्वचषकात 606 धावा मिळवल्या आणि 11 विकेट्स पटकावले. या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शकिबने या विश्वचषकात तीनवेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
तब्बल एका वर्षाच्या कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर विश्वचषकात खेळायला सज्ज झाला होता. एक वर्ष न खेळल्याचा सारा राग वॉर्नरने धावांच्या रुपात काढला.
यंदाच्या विश्वचषकात वॉर्नरने सहाशेपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. या विश्वचषकात सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये वॉर्नर रोहितनंतर दुसऱ्या स्थानावर होता. वॉर्नरने या विश्वचषकात तीन वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला.