आतापर्यंत वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंनी सलग दोनदा विश्वचषक उंचावला होता. कारण १९७५ आणि १९७९ साली वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकला होता. या दोन्ही विश्वचषकात बरेच खेळाडू सारखेच होते.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ साली विश्वचषकाला गवसणी घातली होती.
रिकी पाँटींगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोनदा विश्वचषक पटकावला होता. त्याचबरोबर १९९९ साली जेव्हा ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला होता. तेव्हा रिकी संघाचा भाग होता.
ऑस्ट्रेलियाचा महान स्विंग गोलंदाज ग्लेन मॅग्रानेदेखील आतापर्यंत तिनदा विश्वचषक उंचावला आहे. ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही विजयात त्याची मोलाची भूमिका होती.
ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज आणि यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टनेही तिनदा विश्वचषक उंचावला आहे. २००७ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडाकेबाज खेळी साकारत संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता.