Join us

पहिल्या सेंच्युरीनंतर ती म्हणाली; "मला बिअर लागते!" आता स्टार्कनं बायकोसाठी केलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:56 IST

Open in App
1 / 8

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि सलामीची बॅटर एलिसा हीली हिच्या बॅटमधून सलग दुसरे शतक पाहायला मिळाले. या शतकी खेळीसह तिने संघाला सेमीचं तिकीट मिळवून दिलं. एवढेच नाहीतर ऑस्ट्रेलियाकडून महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवण्याचा विक्रमही आपल्या नावे केला.

2 / 8

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात धावांसाठी संघर्ष करणाऱ्या एलिसा हीलीनं भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

3 / 8

इंग्लंडच्या नॅटली सिल्व्हर ब्रंट हिच्यानंतर वर्ल्ड कपच्या वेगवेगळ्या दोन हंगामात दोन शतके झळकवणारी ती दुसरी महिला क्रिकेटर ठरली आहे.

4 / 8

ब्रंटनं २०१७ आणि २०२२ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच प्रत्येकी २-२ शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे. एलिसा हिलीनं यंदाच्या हंगामात दोन शतके झळकावण्याआधी २०२२ मध्ये अशी कामगिरी केली होती.

5 / 8

एलिसा हीलीच्या सेंच्युरीनंतर तिचा पती आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर मिचेल स्टार्कनं खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

6 / 8

मिचेल स्टार्क याने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून बायकोचा शतकी तोरा दाखवणारा खास फोटो शेअर केला आहे. 'बॅक टू बॅक' सेंच्युरीचा उल्लेख करत त्याने दोन बिअरच्या ग्लाससह चेस करत एलिसाच्या शतकाचा आनंद व्यक्त केल्याचे दिसून येते.

7 / 8

स्टार्कची डियर अर्थात एलिसा हीली हिने भारतीय संघाविरुद्धच्या शतकानंतर खास आणि मजेशीर वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले होते. पोस्ट-प्रेझेंटेशन दरम्यान मेल जोन्सनं तिचं अभिनंदन करताना “आता तुमच्यासाठी आइस बाथ आणि पिकल ज्यूस...असा उल्लेख केला. यावर हीलीनं मला बिअर लागते, असा भन्नाट रिप्लाय दिला होता. तिच्या या वक्तव्यानंतर आता स्टार्कची पोस्ट चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

8 / 8

एलिसा हीली आणि मिचेल स्टार्क ही क्रिकेट जगतातील लोकप्रिय जोडी आहे. परफेक्ट कपल गोल सेट करण्यात ते सगळ्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. एलिसा भारतीय मैदानातील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत असताना दुसऱ्या बाजूला स्टार्क भारतीय संघाविरुद्धच्या वनडे मालिकेत व्यग्र आहे. ही मालिका आटोपून तो महत्त्वाच्या सामन्यात बायकोला चीअर करताना दिसेल, यात शंका नाही.

टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५आॅस्ट्रेलियाबांगलादेश