Join us

'कमबॅक क्वीन'ची कमाल! पाक विरुद्ध साधला मोठा डाव; जाणून घ्या तिच्यासंदर्भातील खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 04:13 IST

Open in App
1 / 9

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत गुणतालिकेत अव्व्वलस्थान पटकावले. दोन्ही विजयात भारताची अनुभवी ऑलराउंडर स्नेह राणा हिने महत्त्वाची भूमिका बजावली.

2 / 9

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिने दोन विकेट्स घेतल्या. २ सामन्यात ४ विकेट खात्यावर जमा करताच ती महिला वनडेत यंदाच्या वर्षात (कॅलेंडर ईयरमध्ये) सर्वाधिक २५ विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली आहे.

3 / 9

उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करणारी स्नेह राणा उजव्या हाताने उत्तम बॅटिंग करण्याची क्षमता असणारी खेळाडू आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला इतिहास घडवायचा असेल, तर तिच्या कामगिरीतील सातत्य महत्तपूर्ण असेल.

4 / 9

स्नेह राणा ही ३१ वर्षांची आहे. २०१४ मध्ये टीम इंडियात पदार्पण केल्यावर २०१६ मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती संघाबाहेर गेली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा स्वत:ला सिद्ध करत पाच वर्षांनी ती पुन्हा टीम इंडियात आलीये. एवढेच नाहीतर तिने इंग्लंड दौऱ्यातून धमाकेदार कमबॅक केलं.

5 / 9

२०२१ मध्ये कसोटी संघातून कमबॅक करताना तिने ४ विकेट्स घेतल्या.

6 / 9

एवढेच नाही तर दुसऱ्या डावात तिने ८० धावांची दमदार खेळी करून दाखवली. या कामगिरीनंतर या अष्टपैलू महिला क्रिकेटरला 'कमबॅक क्वीन' असंही नाव मिळालं आहे.

7 / 9

स्नेह राणानं वनडेत आतापर्यंत ४० सामन्यातील २७ डावात ३२९ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. गोलंदाजीत ४० डावात तिने आपल्या खात्यात ५४ विकेट्स जमा केल्या आहेत.

8 / 9

वनडे कारकिर्दीतील तिच्या खात्यातील जवळपास निम्म्या विकेट्स तिने यंदाच्या कॅलेंडर ईयरमध्ये घेतल्या आहेत. ही आकडेवारी ती सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये असल्याचा पुरावाच आहे.

9 / 9

तिच्या कामगिरीतील सातत्य कायम राहिले तर ती यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकते.

टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ