Join us  

ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाचं नेमकं काय चुकलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 4:16 PM

Open in App
1 / 11

जागतिक महिला दिनी वर्ल्ड कप उंचावून इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियानं गमावली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा हुकुमी पत्ता ( फिरकी गोलंदाजी) अपयशी ठरला.

2 / 11

ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी शतकी सलामी करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. हिली आणि मूनी या दोघींनी टीम इंडियानं जीवदान दिले आणि ती चूक महागात पडली.

3 / 11

फलंदांजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर ऑसी गोलंदाजांनी व क्षेत्ररक्षकांनी आपली भूमिका चोख बजावली. ऑसींनी उभे केलेल्या आव्हानाचे दडपण टीम इंडियाच्या खेळाडूंना पेलवलं नाही आणि त्यांनी हार मानली. ऑस्ट्रेलियानं पाचव्यांदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रम केला.

4 / 11

अ‍ॅलिसा हिली ( ७५) आणि बेथ मूनी ( नाबाद ७८) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाचा उचलला. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ४ बाद १८४ धावा केल्या. दीप्ती शर्मानं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.

5 / 11

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातच निराशाजनक झाली. भारताचा निम्मा संघ ५८ धावांत तंबूत परतला होता. स्पर्धेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करणारी शेफाली वर्मा मोठ्या लक्ष्याचं दडपण पेलवू शकली नाही आणि तिच्याकडून चूक झाली.

6 / 11

शेफालीनंतर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्याकडून साजेसा खेळ अपेक्षित होता. पण, त्यांनीही निराश केले. दडपणात अनुभव कामी आणावा लागतो, हेच त्या विसरल्या. मानधना आणि रॉड्रीग्ज यांना या संपूर्ण स्पर्धेत साजेसा खेळ करता आलेला नाही.

7 / 11

संघाची कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरकडून फार अपेक्षा होत्या. किमात अंतिम सामन्यात तरी ती लौकिकास साजेसा खेळ करेल, अशी माफक अपेक्षा होती. पण, तिलाही अपयश आलं.

8 / 11

नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यामुळे हरमनप्रीतवर आलेले दडपण जाणवले होते आणि त्यात ऑसींनी मोठे लक्ष्य उभे करून त्यात भर घातली.

9 / 11

ज्या फिरकी गोलंदाजांवर आतापर्यंत आपण अवलंबून होतो, त्यांनाच मोक्याच्या क्षणी अपयश आले. त्यात हिली व मूनी यांचा झेल सुटल्यानं गोलंदाजांचा आत्मविश्वास खचला.

10 / 11

ऑस्ट्रेलियानं २०१०, २०१२, २०१४, २०१८ आणि २०२० मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला.

11 / 11

ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. मुनीनं या स्पर्धेत ६४.७५ च्या सरासरीनं २५९ धावा केल्या. त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतआॅस्ट्रेलिया