Join us  

गिलची गरूडझेप! विराट-रोहितला टाकलं माग; क्रमवारीत सिराजची घसरण, पंत टॉप-10 मध्ये कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 3:49 PM

Open in App
1 / 10

भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल हा सध्या जगातील सर्वोत्तम युवा खेळाडूंपैकी एक आहे. अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत त्याने वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक आणि कसोटी तसेच ट्वेंटी-20 फॉर्मेटमध्ये शतक झळकावून आपली ओळख निर्माण केली.

2 / 10

शुबमन गिलच्या शानदार खेळीला आता आयसीसीने देखील सलाम ठोकला आहे. आयसीसी क्रमवारीत त्याने मोठी झेप घेतली असून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मागे टाकले आहे.

3 / 10

मात्र, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या सामान्य गोलंदाजीनंतर मोठा फटका बसला आहे. खरं तर सिराजची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे.

4 / 10

2023 च्या सुरुवातीला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध शुबमन गिलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता. गिलने मागील 6 वन डे सामन्यात 2 शतके आणि 1 द्विशतक झळकावले आहे. याचा त्याला आयसीसी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.

5 / 10

23 वर्षीय गिल भारताचा एकमेव फलंदाज आहे, जो वन डे क्रमवारीतील टॉप-5 फलंदाजांमध्ये आहे. तो भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याही पुढे गेला आहे, जे अनुक्रमे 9व्या आणि 8व्या स्थानावर आहे.

6 / 10

याशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वन डे क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेनंतर वनडेमध्ये नंबर-1 बनलेल्या सिराजची आता तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आला आहे.

7 / 10

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन डे मालिकेत सामान्य प्रदर्शन राहिल्यानंतर सिराजची पहिल्या स्थानावरून घसरण झाली. पहिल्या सामन्यात त्याने 3 बळी घेतले होते. पण दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून भारताला मोठा धक्का दिला.

8 / 10

वनडे क्रिकेटशिवाय कसोटी क्रिकेटबद्दल भाष्य करायचे झाले तर, या यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने शानदार खेळी केली होती.

9 / 10

1 शतक आणि एक द्विशतक झळकावून विल्यमसनने श्रीलंकेचा पराभव केला. यानंतर केनने 4 स्थानांनी झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

10 / 10

तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. कसोटी क्रमवारीमध्ये भारताकडून फक्त रिषभ पंतचा टॉप-10 मध्ये समावेश आहे, जो 9व्या स्थानावर आहे.

टॅग्स :आयसीसीशुभमन गिलविराट कोहलीरोहित शर्मामोहम्मद सिराज
Open in App