आयसीसीने तिन्ही फॉरमॅटसाठी ताजी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये तब्बल पाच भारतीय खेळाडू पहिल्या स्थानावर आहेत.
भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा एकदिवसीय रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याच्या नावे ७८१ गुण आहेत.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. बुमराहच्या नावावर तब्बल ८७९ रेटिंग पॉईंट्स आहेत.
भारताचा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जाडेजा हा कसोटी क्रिकेटच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल आहे. जाडेजाच्या नावे ४५५ गुण आहेत.
अभिषेक शर्मा टी२० रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. कमी वेळात त्याने फलंदाजीची छाप पाडत ९०८ रेटिंग गुण कमावले.
टीम इंडियाचा स्पिनर वरुण चक्रवर्ती टी२० गोलंदाजीत अव्वल आहे. त्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ८०४ गुणांसह स्थान कायम राखले आहे.