Join us  

इब्राहिम झाद्रान बरसला! काल सचिनकडून टिप्स, आज त्याचाच १९९६चा विक्रम मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 6:16 PM

Open in App
1 / 7

या सामन्यानंतर इब्राहिम झाद्रान याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे आभार मानले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील या मॅचपूर्वी सचिनने अफगाणिस्तान संघाची भेट घेतली होती आणि त्याचा अनुभव शेअऱ केला होता. इब्राहिम म्हणाला, काल मी सचि तेंडुलकरला भेटलो आणि त्याने दिलेल्या इनपूटचा मला आज खूप फायदा झाला. तो २४ वर्ष क्रिकेट खेळला आहे. त्याने त्याचा अनुभव आमच्यासोबत वाटून घेतल्यामुळे मी त्याचे आभार मानतो.

2 / 7

२१ वर्षीय इब्राहिम झाद्रानने २७ वन डे क्रिकेटमध्ये ५ शतकं व ५ अर्धशतक झळकावली आहेत. आज तो वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये सर्वात युवा शतकवीर ठरला.

3 / 7

वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानकडून इब्राहिम झाद्रानची १२९ धावांची ही खेळी ही सर्वोत्तम ठरली. यापूर्वी २०१५ मध्ये समिउल्लाह शिनवारीने स्कॉटलंडविरुद्ध ९६ धावा केल्या होत्या. २०२३ मध्येच पाकिस्तानविरुद्ध झाद्रानने ८७ धावा केल्या होत्या.

4 / 7

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये इब्राहिम झाद्रानने तिसरे स्थान पटकावताना शिखर धवनचा २०१९चा ११७ धावांचा विक्रम मोडला. नील जॉन्सनने १९९९मध्ये नाबाद १३२ आणि ख्रिस हॅरिसने १९९६ मध्ये १३० धावांची खेळी केली होती.

5 / 7

५ बाद २९१ धावा या अफगाणिस्तानच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातिल सर्वोत्तम ठरल्या. यापूर्वी २०१९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी सर्वबाद २८८ धावा केल्या होत्या. २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांनी चेन्नईत २ बाद २८६ धावा केल्या होत्या.

6 / 7

वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणारा इब्राहिम झाद्रान ( २१ वर्ष व ३३० दिवस) हा चौथा युवा फलंदाज ठरला. मोहम्मद अश्रफुल ( २० वर्ष व २८२ दिवस), सचिन तेंडुलकर ( २१ वर्ष व १३८ दिवस) आणि डेव्हिड गोवर ( २१ वर्ष व ३०९ दिवस) हे आघाडीवर आहेत.

7 / 7

वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारा इब्राहिम झाद्रान हा दुसरा युवा सलामीवीर ठरला आणि त्याने सचिन तेंडुलकरचा ( २२ वर्ष व ३०० दिवस वि. केन्या, १९९६) विक्रम मोडला. पॉल स्टीर्लिंग ( २० वर्ष व १९६ दिवस वि, नेदरलँड्स, २०११) हा अव्वल आहे,

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानआॅस्ट्रेलियासचिन तेंडुलकर