भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरचा सामना रंगणार आहे. या सामन्याआधीच दोन्ही संघांनी सेमीच तिकीट पक्के केले आहे. पण गटात अव्वल कोण त्याचा फैसला या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.
न्यूझीलंड विरुद्धची ही लढत रोहित शर्मासाठीही खास असेल. कारण या सामन्यात त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास विक्रम मोडण्याची संधी असेल.
भारतीय संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या कॅप्टन्सपैकी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची संधी रोहित शर्माकडे आहे.
सचिन तेडुंलकरनं आपल्या वनडे कारकिर्दीत ७३ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना ३७.७५ च्या सरासरीसह ६ शतके आणि १२ अर्धशतकांसह २४५४ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
रोहित शर्मानं ५३ सामन्यात टीम इंडियाच्या कॅप्टनच्या रुपात ५३.०४ च्या सराससरीसह ५ शतके आणि १६ अर्धशतकासह २३८७ धावा केल्या आहेत.
या यादीत भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सर्वात टॉपला आहे. धोनीनं भारतीय संघाचे नेतृत्व करताना ६६४१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
विराट कोहली कॅप्टन्सीच्या या खास क्लबमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५४४९ धावा केल्या आहेत.
सौरव गांगुलीनं भारतीय संघाची कॅप्टन्सी करताना ५०८२ धावा ठोकल्या आहेत.
मोहम्मद अझरुद्दीन याने आपल्या वनडे कारकिर्दीत भारतीय संघाचे नेतृत्व करताना ५२३९ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.