यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फॉर्म चिंतेचा विषय ठरताना दिसतोय. विजयाने सुरुवात केलेल्या CSKचा त्यापुढच्या सलग ५ सामन्यात पराभव झाला.
नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात संघाला ५ पैकी ४ सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्याजागी एमएस धोनीकडे नेतृत्व आल्यानंतरही काहीच फरक पडला नाही.
सर्वात ताज्या सामन्यात, चेन्नईला कोलकाता नाइट रायडर्स संघाने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर ८ गडी आणि तब्बल ५९ चेंडू राखून पराभवाची धूळ चारली.
चेन्नईला हा पराजय जिव्हारी लागणारा होता. त्यांच्या खराब फॉर्ममुळे आता त्यांचे प्लेऑफ्स फेरीत पोहोचण्याचे दरवाजे बंद होत असल्याची चर्चा सुरु आहे.
चेन्नईचे सध्या केवळ २ गुण असून -१.५५४ चा नेट रनरेट आहे. इतक्या वाईट स्थितीत असूनही, चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेला नाही.
चेन्नईचा संघ अजूनही प्लेऑफ फेरी गाठू शकतो. त्यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या संघाला काही विशिष्ट समीकरणांचा अभ्यास करून मैदानात उतरावे लागेल.
सहसा प्लेऑफ फेरी गाठण्यासाठी १६ गुणांची आवश्यता असते, काही वेळा काँटे की टक्कर असल्यास १४ गुणांचा संघही नेट रनरेटच्या बळावर प्लेऑफ फेरी गाठतो.
गेल्या वर्षा RCB ने पहिल्या ८ पैकी ७ सामने गमावले होते, पण पुढचे सर्व सामने जिंकत त्यांनी १४ गुणांसह प्लेऑफ फेरी गाठली. तसेच काहीसे CSK ला करावे लागेल.
CSK ने त्यांचे सर्व ८ पैकी ८ सामने जिंकले तर ते १८ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरतील. तसेच, ७ सामने जिंकूनही सहज १६ गुणांसह प्लेऑफचे तिकीट मिळवू शकतील.
याशिवाय CSK पुढील ८ पैकी ६ सामने जिंकून १४ गुणांसह देखील प्लेऑफ फेरी गाठू शकेल. पण त्यासाठी त्यांना दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागले.