Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो : टीम इंडियातील खेळाडूच्या गर्लफ्रेंडचे 'Hot' फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 18:52 IST

Open in App
1 / 5

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या टीम इंडियाला वन डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण मालिकेत आतापर्यंत रिषभ पंतला बाकावर बसवून ठेवण्यात आले आहे.

2 / 5

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून टीम इंडियात रिषभ पंतचा समावेश करण्यात आला. पण, पंतला अपेक्षांवर खरं उतरता आले नाही. त्यामुळेच सध्या त्याला वेट अँड वॉच या भूमिकेत राहायला सांगितले आहे.

3 / 5

एकीकडे रिषभ पंत संघाबाहेर असताना त्याची प्रेयसी इशा नेगीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इशा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असलेल्या फोटोंवर लाइक्सचा पाऊस पडत आहे.

4 / 5

रिषभ पंतनं काही दिवसांपूर्वी इशासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. रिषभचे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेलासोबतही नाव चर्चेत आले होते. पण, रिषभनं इशासोबत फोटो पोस्ट करून त्या सर्व अफवांना पूर्णविराम लावला.

5 / 5

इशानेही त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देताना... प्रेमाला पाच वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केल्याची पोस्ट केली होती. इशा इंटेरियर डेकर डिझायनर आहे. डेहराडूनच्या उद्योगपती घराण्यातील ती मुलगी आहे.

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघसोशल व्हायरल