Join us
Daily Top 2Weekly Top 5

DJ गर्ल ते हार्दिक पांड्याची प्रेयसी; नताशा स्टँकोव्हिचबद्दलच्या 'या' गोष्टी जाणून घ्याच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 11:04 IST

Open in App
1 / 9

भारताच्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं 2020च्या पहिल्याच दिवशी तमाम चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिकने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा केला.

2 / 9

हार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली. या फोटोखाली त्याने ''मै तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्थान, अशी कमेंट्स केली आहे. आता ही नताशा कोण हे जाणून घेऊया...

3 / 9

'बादशाह' या म्युझिक व्हिडीओत DJ वाले बावू या गाण्यानं नताशाला प्रसिद्धी मिळवून दिली.

4 / 9

इम्रान हाश्मीच्या The Body या चित्रपटासाठी नव्यानं सादरीकरण करण्यात आलेल्या झलक दिखलाजा या गाण्यात नताशानं डान्स केला होता. 2006 साली अक्सर या चित्रपटातील हे गाणं होतं.

5 / 9

नच बलीए या डान्स रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाच्या नवव्या सत्रात नताशानं ex-boyfriend अ‍ॅली गोणीसह सहभाग घेतला होता. या जोडीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

6 / 9

नच बलीएत डान्स करत असताना नताशानं स्वतःच्याच नृत्यावर नाराजी व्यक्त करताना रडत रडत व्यासपीठ सोडले होते. त्यावर परिक्षक अहमद खान आणि रवीना टंडन यांनी नाराजी व्यक्त केली.

7 / 9

2018मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या 'Zero' या चित्रपटात नताशा छोट्याश्या भूमिकेत दिसली होती. त्यात तिनं अभय देओलच्या गर्लफ्रेंड्सचे काम केले होते.

8 / 9

सत्याग्रह ( 2013), फुकरे रिटर्न ( 2017) आणि डॅडी ( 2017) या चित्रपटांत तिनं डान्स आयटम केले होते.

9 / 9

बिग बॉसच्या आठव्या सत्रातही नताशानं सहभाग घेतला होता. पण, 28 दिवसानंतर तिची घरातून रवानगी झाली.

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचबिग बॉसनच बलियेहार्दिक पांड्या