१९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करत शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय मुलींच्या संघाने इतिहास रचला आहे. या संघातील सर्व १५ जणींची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे...
रोहतकची शेफाली या संघातील सर्वांत चर्चेत राहिलेली खेळाडू ठरली. वरिष्ठ स्तरावर तीनवेळा विश्वचषक अंतिम सामन्यात खेळलेली शेफाली १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत ग्लॅमरस खेळाडू ठरली. नोव्हेंबर २०१९ मध्ये शेफालीने १५ वर्षे २८५ दिवसांचे वय असताना शानदार अर्धशतक झळकावले आणि यासह तिने आपला आदर्श खेळाडू असलेल्या सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडत आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकाविणाऱ्या सर्वांत युवा क्रिकेटपटूचा मान मिळवला.
१५ वर्षीय शब्बमने दोन सामने खेळताना एक बळी घेतला. तिचे वडील नौदलात असून, तेही वेगवान गोलंदाज आहेत.
स्पर्धेत चार सामने खेळताना ५ षटकांत ३० धावा केल्या. मात्र, बळी घेण्यात यश नाही आले.
१५ वर्षांच्या वयामध्ये वरिष्ठ संघात पदार्पण. देशांतर्गत स्पर्धेत शेफाली आणि दीप्ती शर्मा यांना बाद करून सर्वांचे लक्ष वेधले.
वडील नासिर अहमद उत्तर प्रदेशमधील एका शाळेत काम करतात, तर आई गृहिणी आहे. फलकला स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही
स्केटिंगची आवड असलेल्या पार्श्वीला क्रिकेट सामने पाहण्याचीही आवड होती. हळूहळू तिने स्केटिंग बंद करून क्रिकेटसाठी पूर्ण वेळ दिला. विश्वचषक स्पर्धेत तिने सहा सामन्यांत ११ बळी घेतले आणि श्रीलंकेविरुद्ध ५ धावांत ४ बळी घेतले.
क्रिकेट खेळण्यास सुरुवात करण्याआधीच वडिलांना कर्करोगामुळे गमावलेल्या अर्चनाचा जन्म उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्याच्या रताई पूर्वा गावातील एका गरीब घरामध्ये झाला. एक दिवस अर्चनाने फटकावलेला चेंडू शोधताना भाऊ बुद्धिराम याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. भाऊ बुद्धिरामनेच अर्चनाला क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न दाखविले होते.
पटियाळाच्या मन्नतने गल्लीत मुलांसोबत क्रिकेट खेळून आपली छाप पाडली. सुरुवातीला केवळ टाइमपास म्हणून क्रिकेट खेळणाऱ्या मन्नतने पुढे एका नातेवाइकाने सांगितल्यानंतर गंभीरपणे क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
फिरोझाबादच्या या १५ वर्षीय फिरकीपटूचे वडील काचेच्या कारखान्यात काम करतात. सुरुवातील मुलांसोबत खेळणाऱ्या सोनमची गुणवत्ता आणि तिची आवड पाहून वडिलांनी तिला एका अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला. सुरुवातीला फलंदाज म्हणून खेळणारी सोनम आपल्या प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार गोलंदाजीकडे वळली.
भारताच्या विश्वविजेतेपदाच्या प्रवासात श्वेताची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. तिने सात डावांमध्ये तब्बल ९९च्या सरासरीने आणि १४०च्या स्ट्राइक रेटने स्पर्धेत सर्वाधिक २९७ धावा कुटल्या.
कपडे धुण्याचं धोपाटणं हाती घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरुवात केलेल्या सौम्याला प्रशिक्षक सुरेश चियानानी यांनी सुरुवातीला निवडले नाही. मात्र, जेव्हा त्यांनी सौम्याला फलंदाजीची संधी दिली, तेव्हा मात्र तिने आपली क्षमता दाखवून दिली. भारताच्या विजेतेपदामध्ये तिने मोक्याच्या क्षणी धावा काढल्या.
हावडाच्या रिषिताने न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर आपली छाप पाडली.
मुलगी त्रिशाची क्रिकेटपटू बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी आपली चक्क चार एकर जमीन विकली.
महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानणाऱ्या रिचाचा पाॅवर गेम आणखी ताकदवान करण्यासाठी वडील मानवेंद्र घोष यांनी मदत केली. रिचाने गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३६ आणि २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
वयाच्या दहाव्या वर्षी क्लब क्रिकेट संघासोबत स्कोअरर म्हणून साधू नियमितपणे जायची. अंतिम सामन्यातील विजयाच्या शिल्पकारांपैकी एक असलेली साधू चेंडूला उसळी देत दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकते. दहावीच्या परीक्षेत साधूने ९३ टक्के गुण मिळविले. पण, पुढे तिने क्रिकेटसाठी अभ्यास सोडला.