"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप

Shubman Gill Sanju Samson IND vs SA T20: शुबमन गिलने गेल्या तीन सामन्यात २, ० आणि २८ धावा केल्यात.

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी२० मालिका खेळत आहे. यातील ३ सामने खेळून झाले असून, त्यात भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे.

या टी२० मालिकेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये फलंदाजांनी वर्चस्व गाजवल्याचे चित्र आहे. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला आहे.

असे असूनही उपकर्णधार शुबमन गिलला अद्याप सूर गवसलेला नाही. त्याने आतापर्यंत तीन सामन्यात अनुक्रमे २, ० आणि २८ धावा केल्या आहेत.

शुबमन गिलच्या सततच्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांसोबतच भारताचा अनुभवी फलंदाजही शुबमन गिल आणि व्यवस्थापनावर संतापल्याचे दिसले.

मोहम्मद कैफ म्हणाला, "तुम्हाला शुबमन गिलला संघाबाहेर बसवावेच लागेल. त्याला संघातून वगळले असे सांगण्याऐवजी त्याला विश्रांती दिली असे सांगा."

"गिलला खराब खेळूनही वर्षभर संधी मिळतेय आणि मला २-३ खराब खेळीनंतर बाहेर बसवलं असा विचार संजू सॅमसन करत असेल ," असेही कैफ म्हणाला.