Join us  

Hat tricks in T20 World Cup: ब्रेट ली ते कार्तिक... 'हे' आहेत T20 World Cup मधील हॅटट्रिकवीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 2:00 PM

Open in App
1 / 6

Hat tricks in T20 World Cup: टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत युएईचा एक नवा तारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर लुकलुकला. कार्तिक मयप्पन याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दमदार हॅटट्रिक घेतली. टी२० विश्वचषकातील हॅटट्रिकची ही पहिलीच वेळ नाही. २००७ साली पहिल्याच विश्वचषकात ब्रेट लीने याची सुरुवात केली होती. टाकूया एक नजर टी२० विश्वचषकातील हॅटट्रिकवीरांवर...

2 / 6

ब्रेट ली (२००७)- ऑस्ट्रेलियाच्या Brett Lee याने बांगलादेश विरूद्ध केप टाऊन येथे हॅटट्रिक घेतली होती. त्याने शाकिब अल हसन, मश्रफी मोर्तझा आणि अलोक कपाली या तिघांना माघारी धाडले होते.

3 / 6

कर्टिस कॅम्फर (२०२१)- गेल्या वर्षीच्या विश्वचषकात ३ हॅटट्रिक पाहायला मिळाल्या. त्यापैकी आयर्लंडच्या Curtis Campherने यास सुरूवात केली. त्याने नेदरलँड्सविरूद्ध अबुधाबीच्या मैदानात ही किमया साधली. त्याने सीएन एकरमन, आरएन टेन डेस्कॉचे, एसए एडवर्ड्स आणि रूलॉफ वॅन डर मर्व असे ४ चेंडूत ४ बळी टिपले.

4 / 6

कगिसो रबाडा (२०२१)- इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात आफ्रिकेच्या Kagiso Rabada ने हॅटट्रिक टिपली. त्यानेदेखील शारजाच्या मैदानावरच हा कारनामा केला. ख्रिस वोक्स, इयॉन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डन या तिघांना रबाडाने बाद केले.

5 / 6

वानिंदू हसरंगा (२०२१)- श्रीलंकेच्या Wanindu Hasaranga ने शारजाच्या मैदानावर आफ्रिकेचे एडन मार्करम, टेंबा बवुमा आणि ड्वेन प्रिटोरियस हे तीन गडी बाद करत हॅटट्रिक साजरी केली.

6 / 6

कार्तिक मयप्पन (२०२२)- युएईच्या Kartik Meyyappan ने श्रीलंकेविरूद्ध हॅटट्रिक घेतली. भानुका राजपक्षे, चरिथ असालांका आणि दसून शनाका या तिघांना त्याने गीलाँगच्या मैदानावर हतबल करत हॅटट्रिक साजरी केली.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आॅस्ट्रेलियाद. आफ्रिकाश्रीलंकासंयुक्त अरब अमिराती
Open in App