आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल

भारतीय महिला संघाची वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार हरमनप्रीतचं खास फोटो सेशन

भारतीय संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देत हरमनप्रीत कौरनं कपिल पाजी (१९८३ वर्ल्ड कप विजेता कॅप्टन) आणि महेंद्रसिंह धोनी (२०११ वर्ल्ड कप विजेता कॅप्टन) या दिग्गजांच्या पक्तींत सामील झाली आहे.

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यावर आनंद व्यक्त करताना भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं उप-कर्णधार स्मृती मानधनाच्या साथीनं रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० वर्ल्ड कप जेतेपद मिरवल्यावर दिलेली ऑयकॉनिक पोझ रिक्रिएट केल्याचे पाहायला मिळाले होते.

या फोटोत हरमनप्रीत कौरनं भारताचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला फॉलो केल्याचे दिसत आहे. तिने वर्ल्ड कप ट्रॉफीसह मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक ठिकाणी फोटोसेशन केले आहे.

आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन हरमनप्रीत कौरच्या खास फोटो सेशनची झलक शेअर करण्यात आली आहे.

हरमनप्रीत कौर वर्ल्ड कप जिंकणारी चौथी भारतीय कर्णधार ठरली आहे. याआधी कपिल देव (१९८३ वनडे वर्ल्ड कप स्पर्धा), महेंद्रसिंह धोनी (२००७ टी-२० आणि २०११ वनडे वर्ल्ड कप स्पर्धा) तर रोहित शर्मानं (२०२४ टी-२० वर्ल्ड स्पर्धा) जिंकली आहे.

१९८३ मध्ये पहिली वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर २०११ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीनं मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे खास फोटो सेशन केले होते. धोनी एकमेव असा कर्णधार आहे ज्याने टी-२० आणि वनडे वर्ल्ड कपसह आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली आहे.