टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविक यांनी कुटुंबीयांसोबत नुकतीच झकासपैकी सुटी एन्जॉय केली.
ज्युनियर पांड्या म्हणजेच हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्य यानेही व्हेकेशनचा भरपूर आनंद लुटला. हार्दिकची पत्नी नताशा हिने त्यांचे हे व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हार्दिक-नताशा हे कायम विविध कारणांसाठी चर्चेत असतात. पण यावेळी हार्दिक, नताशा आणि अगस्त्य यांनी ही सुटी आपल्या कुटुंबीयांसोबत साजरी केल्याचं दिसून आलं.
'ज्युनियर पांड्या' अगस्त्य याने आपल्या आजी-आजोबांसोबत छान वेळ घालवला आणि धमाल मस्ती केली. नताशाचे आई वडिल या व्हेकेशनवर पांड्या कुटुंबासोबत असल्याचे फोटो नताशाने शेअर केले.
सतत क्रिकेटच्या दौऱ्यांमुळे बाहेर गावी किंवा परदेशी असलेल्या हार्दिक पांड्याने क्रिकेट सिरीजमधून विश्रांती मिळाल्यानंतर आपला मुलगा अगस्त्य याच्याबरोबर धमाल मस्ती करून एन्जॉय केलं.
अगस्त्य साठी ही सुट्टी एकदम खास दिसून आली. आई, बाबा अन् आजी, आजोबा असा सगळ्यांसोबत ग्रीसमधील एक आलिशान व्हिलामध्ये त्याने सुटी एन्जॉय केली. इतकेच नव्हे तर वेगवेगळे स्टायलिश पोशाख करून त्याने फोटोसेशनही केल्याचे दिसले.
हार्दिक आणि नताशा हे आपापल्या फिटनेसची काळजी घेत असले तरी ते खवय्ये आहेत हे तर साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ग्रीसच्या या लोकेशनवर त्यांनी तेथील काही 'स्थानिक स्पेशल' अशा पदार्थांचाही आस्वाद घेतल्याचं दिसलं.
ज्युनियर पांड्या अगस्त्य या सुट्टीत फळांचा आस्वाद घेतानाचा एक झकास फोटो नताशाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत अगस्त्य अगदी राजेशाही थाटात समुद्रकिनारी बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसतोय.
हार्दिक आणि नताशा यांचाही एक रोमँटिक फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हार्दिकने याआधीही अनेक वेळा नताशासोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. तसाच एक फोटो या व्हेकेशनमध्येही त्यांनी काढला आहे अन् चाहत्यांनीही या फोटोंना तुफान पसंती दर्शवली आहे. (सर्व फोटो सौजन्य- नताशा स्टँकोविक Instagram)