Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hardik Pandya : नाईट क्लबमध्ये पहिली भेट, मुलाचा जन्म अन् ३ वेळा लग्न; 'अशी' होती हार्दिक-नताशाची लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 10:08 IST

Open in App
1 / 13

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविच यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेर गुरुवारी हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हार्दिक-नताशाने घटस्फोटाची बातमी चाहत्यांना दिली.

2 / 13

हार्दिक आणि नताशा यांची पहिली भेट २०१८ मध्ये मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये झाली, तिथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. तेव्हा नताशाला हे माहित नव्हते की, हार्दिक क्रिकेटर आहे. या भेटीनंतर हार्दिकने नताशाला त्याच्या वाढदिवसाला आमंत्रित केले होतं.

3 / 13

हार्दिकने स्वत:च ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. तो म्हणाला होता की, - 'नताशाला मी कोण आहे याची कल्पना नव्हती. आम्ही एकमेकांशी बोललो आणि नंतर हळूहळू जवळ आलो. मी रात्री एक वाजता टोपी, गळ्यात चेन आणि हातात घड्याळ घालून बसलो होतो.'

4 / 13

'नताशाला वाटलं कोणीतरी रँडम व्यक्ती आहे. याच दरम्यान आमचा संवाद सुरू झाला. त्यानंतर आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.' हार्दिक आणि नताशा अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसू लागले. २०२० पूर्वी या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा खुलासा केला नाही.

5 / 13

हार्दिकला वाटलं की नताशा ही योग्य व्यक्ती आहे जिच्यासोबत तो आपले संपूर्ण आयुष्य घालवू शकतो. यानंतर त्याने तिला २०२० मध्ये फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले. ज्याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्याची तुफान चर्चा रंगली.

6 / 13

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि एके दिवशी अचानक दोघांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. या जोडप्याने कोर्ट मॅरेज केलं होतं आणि काही दिवसांनी अभिनेत्री गरोदर असल्याचं समोर आलं.

7 / 13

अभिनेत्री गरोदर असल्याच्या बातमीमुळे दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले. जुलै २०२० मध्ये त्यांना एक मुलगा झाला. ज्याचं नाव अगस्त्य आहे. नताशा आणि हार्दिक अनेकदा त्यांच्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

8 / 13

मुलाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी, २०२३ मध्ये हार्दिक आणि नताशाने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी आधी हिंदू आणि नंतर ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार मोठ्या थाटामाटात लग्न केलं. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.

9 / 13

सर्व काही ठीक चाललं होतं पण याच वर्षी IPL दरम्यान नताशा आणि हार्दिक यांच्यात काहीही ठीक नाही अशी बातमी आली. मात्र, सुरुवातीला याला पीआर स्टंट असंही म्हटलं जात होतं.

10 / 13

या अफवांना वेग आला जेव्हा अचानक नताशाने तिचे आणि हार्दिकच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवरून काढून टाकले आणि तिच्या नावातून तिचं आडनाव देखील काढून टाकलं. पण आता नताशा आणि हार्दिक दोघेही वेगळे झाले आहेत.

11 / 13

हार्दिकने याबाबत पोस्ट केली आहे. 'चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हे नाते वाचवण्यासाठी सर्व काही दिले. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते.'

12 / 13

'आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास घेत आम्ही एक कुटुंब म्हणून वाटचाल केली. मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात अगस्त्य आहे, जो नेहमी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असेल.'

13 / 13

'आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्याला जगातील सर्व सुख मिळावे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्याच्या आनंदासाठी जे काही करता येईल ते करू. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात आमची प्रायव्हसी तुम्ही समजून घ्याल' असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचघटस्फोट