धोनीने इंग्लंड दौऱ्यावर असताना आपला 37 वा बर्थ कुटुंसाबसह साजरा केला. यावेळी संघातील सहकाऱ्यांसोबत केक कापून धोनीने सेलिब्रेशन केलं.
पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासमवेत धोनीने केक कापला. साक्षी आणि झिवाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
धोनीच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही हेजरी लावली.
सुरैश रैनाने धोनीचा बर्थ डे सेलिब्रेशन संस्मरणीय बनवला. यावेळी सहकाऱ्यांसोबत रैनाने झिवाला घेऊन लहान मुलांप्रमाणे मस्तीही केली.
बर्थ डे सेलिब्रेशननंतर धोनीच्या चेहऱ्यावर केक लावायलाही टीम इंडिया विसरली नाही. रैनाने तोंडावर केक लावलेल्या धोनीसोबत सेल्फीही घेतला.