IPL मेगा लिलावाआधी ग्लेन मॅक्सवेलनं खास वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १० हजार धावा करण्याचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.
ग्लेन मॅक्सवेल यानं टी-२० क्रिकेटमध्ये ६५०५ चेंडूत १० हजार धावांचा टप्पा गाठला आहे. त्याने केरॉन पॉलार्डला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले आहे.
वेस्ट इंडिज स्टार केरॉन पोलार्डनं ६६४० चेंडूत टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
युनिव्हर्सल बॉस या नावाने प्रसिद्ध असलेला कॅरेबियन स्फोटक फलंदाज ख्रिस गेल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १४५६२ धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावे असलेल्या गेलनं १० हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी ६७०५ चेंडूंचा सामना केला होता.
इंग्लंडच्या ॲलेक्स हेल्स याने ६७७४ चेंडूत १० हजार धावांचा टप्पा गाठला होता. तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडचा स्टार फलंदाज जोस बटलर याने टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी ६९२८ चेंडूचा सामना केला होता.