शिखर धवनची 'सेकंड इनिंग'! ४०व्या वर्षी पुन्हा विवाहबद्ध, सोफी शाईनशी बांधली लग्नगाठ (PHOTOS)

Shikhar Dhawan marries Sophie Shine Wedding Photos: शिखर धवनने पारंपरिक पद्धतीने सोफीशी लग्न केले

भारतीय संघाचा माजी स्टार फलंदाज शिखर धवन शनिवारी आयरिश गर्लफ्रेंड सोफी शाईन हिच्याशी विवाहबद्ध झाला. धवनने स्वत: लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

एका वर्षापेक्षा जास्त काळ रिलेशनशिपमध्ये असलेल्या शिखर धवनने २१ फेब्रुवारीला एका खाजगी समारंभात मोजक्या निमंत्रितांच्या साक्षीने सोफीशी लग्नगाठ बांधली.

शिखर धवन आणि सोफी शाईन यांचा लग्नसोहळा तीन दिवस सुरु होता. त्या दोघांनी आपल्या संगीत समारंभाचे आणि मेहंदीचे फोटोही पोस्ट केले होते.

शिखर धवनची पत्नी सोफी शाइन ही आयर्लंडची मॉडेल आहे. शिखर आणि सोफी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान सार्वजनिकरित्या पहिल्यांदा एकत्र दिसले.

त्यानंतर मे २०२५ मध्ये इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून त्यांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केली आणि नंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

शिखर सोफीपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. शिखरने अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यानंतर परवा शिखरने संगीत नाईटचे फोटो पोस्ट केले. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे दोन ते तीन दिवसांतच त्याने आपल्या दुसऱ्या लग्नाचे फोटोही पोस्ट केले.