Join us  

उत्साह शिगेला! IPLच्या पहिल्या सामन्यासाठी 'अहमदाबाद' सज्ज; चाहते म्हणाले, रोहित शर्मा कुठंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 5:08 PM

Open in App
1 / 10

जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आपल्या 16व्या हंगामाकडे कूच करत आहे. उद्यापासून आयपीएलचा थरार रंगणार असून सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

2 / 10

बहुचर्चित स्पर्धेला सुरूवात होण्याआधी इंडियन प्रीमिअर लीगच्या सोशल मीडिया हॅंडलवरून सर्व संघाच्या कर्णधारांचा ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

3 / 10

मात्र, या फोटोत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दिसत नाही आहे. त्यामुळे चाहते हिटमॅन कुठे आहे? अशा प्रतिक्रिया देत आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे.

4 / 10

आयपीएल अकाउंटवरून शेअर केलेल्या फोटोत इतर 9 संघाचे कर्णधार पाहायला मिळत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलचा पहिला सामना आणि त्याआधी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

5 / 10

IPL अकाउंटवरून शेअर केलेल्या फोटोत सलामीचा सामना असलेल्या संघाचे कर्णधार हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी सोबत दिसत आहेत. सामन्याच्या आधी उद्घाटन समारंभ पार पडेल, ज्यामध्ये भारताची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया, रश्मिका मंधाना नृत्य करणार आहेत.

6 / 10

लक्षणीय बाब म्हणजे कोविड-19 नंतर प्रथमच आयपीएलच्या उद्घाटन समारंभात स्टार्स परफॉर्म करताना दिसणार आहेत.

7 / 10

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सच्या संघाने मागील वर्षी आयपीएलचा किताब पटकावला. त्यामुळे गतविजेत्या संघाच्या कर्णधारावर सर्वांचे लक्ष असणार आहे.

8 / 10

ग्रुप ए - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स - ग्रुप बी - चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स

9 / 10

आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचा पहिला सामना 8 एप्रिल रोजी होणार आहे.

10 / 10

आयपीएलच्या 16 व्या हंगामात एकूण 12 स्टेडियमवर साखळी फेरीतील 70 सामने खेळवले जातील. 18 डबल हेडर सामने असतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर 7 आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर 7 सामने खेळतील.

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्मामुंबई इंडियन्सहार्दिक पांड्यानरेंद्र मोदी स्टेडियम
Open in App