Eoin Morgan Love Story : Ashes जिंकायला गेलेल्या इयॉन मॉर्गनने प्रेमात बाजी मारली; ऑस्ट्रेलियन पोरगी पटवली!

WHO IS EOIN MORGAN’S WIFE, TARA RIDGWAY? इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

WHO IS EOIN MORGAN’S WIFE, TARA RIDGWAY? - इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २००६ मध्ये त्याने इंग्लंडच्या संघाकडून पदार्पण केले होते. त्याआधी त्याने आयर्लंड संघाचेही प्रतिनिधित्व केले होते.

३५ वर्षीय मॉर्गन हा इंग्लंडचा वन डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने २२५ वन डे सामन्यांत १३ शतकांसह ६९५७ धावा केल्या आहेत. एकूण वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७७०१ धावा आहेत आणि १४ शतकं आहेत.

मॉर्गनने १२६ सामन्यांत इंग्लंडने नेतृत्व केले आणि त्यापैकी ७६ मध्ये विजय मिळला. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद हा त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही त्याने ११५ सामन्यांत १३६.१८च्या स्ट्राईक रेटने २४५८ धावा केल्या आहेत.

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याने ७२ सामन्यांत नेतृत्व करताना ४२ विजय मिळवले आहेत. भारत-इंग्लंड यांच्यात तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत दुसरा कर्णधार मिळणार आहे. जोस बटलरकडे ही जबाबादरी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ट्वेंटी-२० व वन डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इयॉन मॉर्गनची लव्ह स्टोरीही खास आहे. ऑस्ट्रेलियातील एडलेड येथील तारा रिडवे ( Tara Ridgway ) हिच्यासोबत मॉर्गनने लग्न केले. २०१०-११च्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात गेला होता आणि एडलेड येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत मॉर्गन व ताराची भेट झाली.

इंग्लंडने ती कसोटी एक डाव व ७१ डावांनी जिंकला. इंग्लंडने पहिला डाव 5 बाद 620 धावांवर घोषित केला होता. या सामन्यात मॉर्गन खेळला नव्हता. पण, तारा अन् त्याच्या प्रेमाची तिथून सुरूवात झाली. नोव्हेंबर 2018 मध्ये या दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला ब्रेंडन मॅक्युलम, जेम्स अँडरसन व अॅलिस्टर कूक हे उपस्थित होते.

तारा ही मॉडलिंग करायची, परंतु सध्या ती लंडनमध्ये मार्केटिंगचं काम करते. ती फॅशन ब्रँड Burberry साठी मार्केटिंगचं काम पाहते. तिने कायद्याची पदवी घेतलेली आहे. 2020 मध्ये मॉर्गन व तारा यांना पुत्रप्राप्ती झाली. लिओ लुईस ऑलिव्हर असे त्याचे नाव ठेवण्यात आले.