Join us

SENA देशांत पंतची सेंच्युरी म्हणजे टीम इंडियासाठी 'पनौती'; इथं पाहा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 23:03 IST

Open in App
1 / 9

इंग्लंड दौऱ्यातील लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाच शतके झळकावूनही टीम इंडियाची पदरी पराभव आला.

2 / 9

खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव हे टीम इंडियाच्या पराभवामागचे प्रमुख कारण असल्याची गोष्टही चर्चेचा विषय ठरतीये.

3 / 9

यात आता पंतची सेंच्युरी ही टीम इंडियासाठी 'पनौती' असल्याचे चर्चा रंगू लागली आहे. यामागचं कारण SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) या देशांत पंतनं शतक झळकवल्यावर टीम इंडियाला आतापर्यंत कधीच विजय मिळालेला नाही.

4 / 9

रिषभ पंतनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील ८ शतकांपैकी ६ शतके ही SENA देशांत झळकावली आहेत. दुर्देव हे की, त्याचं एकही शतक टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकलेले नाही.

5 / 9

पंतनं २०१८ मध्ये केनिंग्टन द ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ११४ धावांची खेळी केली होती. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

6 / 9

२०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात रिषभ पंतनं नाबाद १५९ धावांची खेळी केली. हा सामना अनिर्णित राहिला होता.

7 / 9

२०२२ केपटाउनच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंतनं नाबाद १०० धावा केल्या. टीम इंडियाला या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला.

8 / 9

२०२२ मध्ये बर्मिंघमच्या मैदानात इंग्लंड विरुद्धच्यास सामन्यात भारतीय विकेट किपर बॅटरच्या भात्यातून १४६ धावांची खेळी आली होती. इथंही टीम इंडियाची पदरी निराशाच आली. हा सामनाही भारतीय संघाने गमावला होता.

9 / 9

आता लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात दोन्ही डावांतील शतकासह पंतनं इतिहास रचला. पण टीम इंडियाला हा सामनाही जिंकता आला नाही.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ