Join us

'मियाँ मॅजिक'! जे बुमराहलाही जमलं नाही ते सिराजनं करून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 01:27 IST

Open in App
1 / 9

इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजनं इंग्लंडच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना ६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

2 / 9

बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात कसोटी कारकिर्दीतील चौथा 'पंजा' मारताना यजमान संघाच्या पहिल्या डावात ७० धावा खर्च करत त्याने ६ विकेट्स घेतल्या. ही त्याची आतापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च कामगिरी ठरली.

3 / 9

२०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात त्याने पहिल्यांदा पाच विकेट्सचा डाव साधला होता. १९.५ षटकात ७३ धावा खर्च करत त्याने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत धाडला होता.

4 / 9

जुलै २०२३ मध्ये मोहम्मद सिराजनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात ६० धावांत ५ विकेट्स घेत दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या होत्या.

5 / 9

२०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत मोहम्मद सिराजनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवली होती. या कसोटी सामन्यात त्याने १५ धावा खर्च करत ६ विकेट्स घेतल्या होत्या. कसोटी कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

6 / 9

एजबॅस्टनच्या मैदानातील कामगिरीसह दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या मैदानात ६ विकेट्स हॉलचा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमरासह अन्य कोणत्याही भारतीय गोलंदाजाला या दोन्ही देशांत एका डावात ६ विकेट्सचा डाव साधता आलेला नाही.

7 / 9

सिराजशिवाय इशांत शर्मा, अमर सिंह, भागवत चंद्रशेखर, चेतन शर्मा, भुवनेश्वर कुमार, दिलीप दोशी, बिशन सिंग बेदी या आठ गोलंदाजांनी इंग्लंडच्या मैदानात एका डावात ६ विकेट्स घेण्याचा डाव साधला आहे.

8 / 9

जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, रवींद्र जडेजा, आणि सिराज या ७ गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात कसोटीतील एका डावात ६ विकेट्स घेतल्या आहेत.

9 / 9

SENA देशांत (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) सिराजनं दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये तर जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात ६ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५मोहम्मद सिराजजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ