क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नी आणि भारताची स्टार स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल सध्या चर्चेत आहे. कारण, ती चार वर्षांनंतर कोर्टवर पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. आता तिची नजर यावर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांवर आहे. दिनेश कार्तिकच्या पत्नीप्रमाणेच त्याची सासूही क्रीडापटू असून, त्या भारताच्या माजी क्रिकेटपटू आहेत.
दीपिका पल्लीकलने कुटुंबाला वेळ देण्यासाठी खेळामधून ब्रेक घेतला होता. मागच्या वर्षीच दीपिका पल्लिकल आणि दिनेश कार्तिक यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला होता.
मात्र दीपिका पल्लिकलची आई म्हणजेच दिनेश कार्तिकची सासू सुसान इत्तिचेरिया ह्या भारताच्या माजी क्रिकेटपटू आहेत.
सुसान यांनी ७ कसोटी आणि २ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी १९७८ मध्ये महिला विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
दीपिका पल्लिकलने २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये जोशना चिनप्पासोबत मिळून सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता.
दीपिका पल्लिकल हिन बक्षीसाच्या रकमेतील असमानतमुळे पाच वर्षांपर्यंत राष्ट्रीय स्पर्धा खेळली नव्हती. २०१६ मध्ये बक्षिसाची रक्कम समान झाल्यावर तिने स्पर्धेत पुनरागमन केले होते.