Join us

"ही मोठी स्पर्धी होती पण...", दिनेश कार्तिकनं सांगितलं चहलला विश्वचषकात न खेळवण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 20:44 IST

Open in App
1 / 6

टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारतीय संघाचा इंग्लंडकडून दारूण पराभव झाला होता. इंग्लिश संघाने १० गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. अखेर अंतिम फेरीत इंग्लिश संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारून विश्वचषकाचा किताब जिंकला. मात्र विश्वचषक संपल्यानंतर देखील भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

2 / 6

खरं तर भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल विश्वचषकाच्या संघाचा हिस्सा होता. मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. यावरून अनेक भारतीय माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर निशाणा साधला होता. आता याच प्रश्नाचे उत्तर भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने दिला आहे.

3 / 6

भारतीय संघाने साखळी फेरीतील ४ सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. मात्र युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. हे दोनच खेळाडू असे होते ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

4 / 6

भारतीय संघाचा फलंदाज दिनेश कार्तिकने क्रिकबझशी संवाद साधताना म्हटले, 'हर्षल आणि चहल यांना संधी मिळाली नाही म्हणून ते एकदाही रागावले नाहीत, ते खूप आत्मविश्वासी होते. स्पर्धेच्या सुरूवातीला त्यांना सांगण्यात आले की, इथे तुम्हाला खेळवले जाईल अन्यथा पुढे खेळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे ते तयारी करत होते. युझवेंद्र चहलला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो सर्वोत्तम देण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही.'

5 / 6

२०२१ च्या टी-२० विश्वचषकात चहलची संघात निवड झाली होती, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. चहलला न खेळवल्याने कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका होत आहे.

6 / 6

'जेव्हा प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याकडून ही स्पष्टता असते, तेव्हा खेळाडूसाठी गोष्टी अधिक सोप्या होतात कारण तेव्हा खेळाडू फक्त स्वतःमध्ये डोकावून चांगली तयारी करायला सुरूवात करतो. त्याचा देखील हाच प्रयत्न होता की संघात जेव्हा स्थान मिळेल तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करायची. ही मोठी स्पर्धा होती. जसे पार्थिव पटेलने भारतासाठी बरेच सामने खेळले आहेत आणि तरीदेखील त्याला संघाबाहेर व्हावे लागले होते.' अशा शब्दांत कार्तिकने युझीला संधी न मिळाल्यावर स्पष्टीकरण दिले.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२युजवेंद्र चहलदिनेश कार्तिकभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा
Open in App