Smriti Mandhana : भावामुळं डावखुरी झाली अन् सर्वांपेक्षा 'उजवी' ठरली! क्रिकेटच्या मैदानातील क्वीनची खास स्टोरी

पण तुम्हाला माहितीये का? सांगलीकर स्मृती क्रिकेटरच्या रुपात घडली ती भावामुळे.

भारतीय महिला संघाची स्टार बॅटर आणि उप कर्णधार स्मृती मानधना हिने क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडलीये.

डावखुऱ्या हाताच्या बॅटरनं क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. पण तुम्हाला माहितीये का? सांगलीकर स्मृती क्रिकेटरच्या रुपात घडली ती भावामुळे. एवढेच नाही तर बॅटिंगमध्ये ती डावखुरी ही त्याच्यामुळेच झाली. इथं जाणून घेऊयात भावाला फॉलो करत क्रिकेटच्या मैदानात उजवी ठरलेल्या डावखुऱ्या बॅटरसंदर्भातील खास गोष्ट

स्मृती मानधनाचा मोठा भाऊ श्रवण हा देखील एक उत्तम क्रिकेटर आहे. अंडर १६ गटात चमकदार कामगिरीनंतर त्याचे वृत्तपत्रात फोटोही छापून यायचे. ते पाहूनच आपणही क्रिकेटर व्हावं अस स्मृती मानधनाच्या मनात आलं. अनेक मुलाखतीमध्ये स्मृतीनं ही गोष्ट बोलून दाखवलीये.

श्रवण हा डावखुऱ्या हाताने फलंदाजी करायचा. त्यामुळे त्याला फॉलो करत मूळ उजवी असूनही स्मृतीनंही डावखुऱ्या शैलीतच फलंदाजीला सुरुवात केली.

वयाच्या १५ व्या वर्षी सायन्स विषयात रस दाखवत स्मृती मानधनाने क्रिकेट सोडण्याचा विचारही केला होता. पण आईमुळे ती क्रिकेटमध्ये स्थिरावली अन् आज ती क्रिकेटच्या मैदानातील क्वीन म्हणून ओळखली जातेय.

स्मृती मानधना हिचे मोठा भाऊ श्रवण याच्यासोबत खास बॉन्डिंग पाहायला मिळते. श्रवण याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला हा खास फोटो बहिण भावाच्या नात्यातील गोडवा किती भारी असतो तेच दाखवणारा आहे.

स्मृतीच्या भावने शेअर केलेला हा एक जुना फोटो आहे. यातही बहिण भावातील प्रेमाचा खास गोडवा तुम्हाला दिसून येईल.

श्रवण आणि स्म-ती मानधना यांचा दोन फ्रेमधील हा फोटो खूपच क्वुट आहे.