आयपीएलच्या मेगाऑक्शनमध्ये १४ कोटी रुपयांच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्समध्ये दाखल झालेल्या दीपक चहरने व्हॅलेंटाईन डे निमित्त होणारी पत्नी जया भारद्वाज हिला खास गिफ्ट दिले आहे. जया हिने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केले आहेत.
व्हॅलेंटाईन डे दिवशी दीपक चहरने जया भारद्वाजसोबतचा आपला एक फोटो शेअर करून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
या फोटोवर जयाने हार्ट इमोजीसोबत रिअॅक्ट केले होते. तसेच दीपकने होणाऱ्या मेहुण्यानेही या फोटोवर रिअॅक्ट केले.
दीपक चहरचा होणारा मेहुणा सिद्धार्थ भारद्वाज म्हणाला की, वाह शेरा...
दीपक चहरने त्याची होणारी पत्नी जया हिला लाल गुलाब असलेला बुके दिला.
गतवर्षा आयपीएलमधील एका सामन्यानंतर दीपक चहरने स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यांवर बसून जया भारद्वाज हिला प्रपोझ केले होते.