Join us

क्रिकेटपटूंच्या यशस्वी पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 17:25 IST

Open in App
1 / 6

क्रिकेटपटूंप्रमाणे त्यांच्या पत्नीही आपापल्या क्षेत्रात यशस्वी असल्याची उदाहरणे आहेत. आपल्या क्रिकेटपटू पतीच्या सामन्याला हजेरी लावणे आणि त्यांच्यासाठी चिअर करणे एवढेच त्यांचे काम नाही. तर त्यांनी त्यांच्या क्षेत्रातही आपले वर्चस्व निर्माण केले आहे. चला पाहूया अशा पाच यशस्वी क्रिकेटपटूंच्या यशस्वी पत्नी...

2 / 6

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही सतत चर्चेत राहणारी जोडी आहे. विराटशी लग्न करण्यापूर्वीच अनुष्काने अभिनय क्षेत्रात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. उत्तम नायिका आणि निर्माता म्हणून ती ओळखली जाते.

3 / 6

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिनेही आपल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. ती पेशाने क्रीडा व्यवस्थापक आहे.

4 / 6

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीचे स्वतःचे interior designचे स्टोर आहे.

5 / 6

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल जॉन्सन याची पत्नी जेस्सीका ब्रॅटीच ही यशस्वी खेळाडू आहे. तिने कराटेच्या जागतिक स्पर्धेत 2006 मध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

6 / 6

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची पत्नी डोना गांगुली क्लासिकल डान्सर आहे आणि तिची स्वतःची डान्स अकादमी आहे.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मामहेंद्रसिंह धोनीरोहित शर्मासौरभ गांगुली