भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीइतकाच त्याच्या मुलीचा म्हणजेच जीवाचा फॅन फॉलोअर्स आहेत. चिमुकल्या जीवाच्या नावावनं इंस्टाग्रामवर सोशल अकाऊंटही आहे.
त्यामुळे जीवाच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर नेटिझन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतो. सध्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात क्युट लेक अशी जीवाची ओळख आहे.
पण, जीवा इतकीच या क्रिकेटपटूची लेकही Cute आहे आणि तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. ऑसी संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची कन्याही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
डेव्हिड वॉर्नरनं आणि त्याची पत्नी कँडीस यांच्या घरी गतवर्षी आणखी एक नवा सदस्य आला. वॉर्नरला तीन मुली आहेत. इस्ला रोझ, आयव्ही मी आणि इंडी रे अशा या तिघींची नावं आहेत.
यापैकी इंडीचा आज चौथा वाढदिवस आहे आणि वॉर्नरने सोशल मीडियावर इंडीचा फोटो शेअर करताना तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यानं लिहिले की,''माझ्या सुंदर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्वांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य फुलवणारी तू... मला अजूनही विश्वास बसत नाही, की तू चार वर्षांची झालीस.''