Smriti Mandhana Net Worth : क्रिकेटच्या मैदानातील 'राणी'च्या श्रीमंतीची गोष्ट

तुम्हाला माहितीये का? क्रिकेटच्या मैदानातील विक्रमी कामगिरीसह नॅशनल क्रशचा टॅग लागलेली महिला खेळाडू क्रिकेटशिवाय अन्य माध्यमातूनही बक्कल कमाई करते.

महिला क्रिकेट जगतात १८ क्रमांकाच्या जर्सीत मिरवणारी स्मृती मानधना १८ जुलैला आपला वाढदिवस साजरा करते.

तुम्हाला माहितीये का? क्रिकेटच्या मैदानातील विक्रमी कामगिरीसह नॅशनल क्रशचा टॅग लागलेली महिला खेळाडू क्रिकेटशिवाय अन्य माध्यमातूनही बक्कल कमाई करते.

इथं जाणून घेऊयात क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय आपल्या सौदर्यानं क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या स्मृती मानधनाच्या कमाईसंदर्भातील खास गोष्ट

स्मृती मानधनाचे नेटवर्थ जवळपास ३३ कोटी रुपयांच्या घरात आहे. बीसीसीआयसोबतचा वार्षिक करार हे तिच्या उत्पनाच्चा प्रमुख माध्यम आहे. ती 'अ' श्रेणीतील खेळाडू असून बीसीसीआयकडून वर्षाला तिला ५० लाख रुपयांचे पॅकेज मिळते.

महिला प्रीमियर लीगमधूनही स्मृती माधना तगडी कमाई करते. RCB महिला संघाचे नेतृत्व करताना संघाला पहिले वहिले जेतेपद मिळवून देणाऱ्या स्मृती मानधना ही WPL मधील सर्वात महागडी खेळाडू आहे. RCB च्या संघाने तिच्यासाटी ३.४ कोटी एवढी मोठी रक्कम मोजलीये.

स्मृती मानधनाला एका कसोटी सामन्यासाठी १५ लाख, वनडेसाठी ६ लाख तर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये एवढी रक्कम मिळते.

स्मृती मानधना गार्नियर, मास्टर कार्ड, ह्युंदाई, हीरो, रेड बुल, बूस्ट, स्पेक्टाकॉम, मास्टरकार्ड इंडिया यासारख्या प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरतीतून लाखो रुपयांची कमाई करते.

क्रिकेटच्या मैदानाबाहेर स्मृती मानधना बॉक्स क्रिकेट व्यवसायात सक्रीय असून SM18 नावाच्या रेस्तराँचीही ती मालकीण आहे. देशातील वेगवेगळ्या शहरात या रेस्तराँचा विस्तार झालेला आहे.

स्मृती मानधना ही कारची शौकीन आहे. तिच्याकडे ह्युंदाई क्रेटा , मारुती स्विफ्ट डिझायर, ऑडी आणि बीएमडब्ल्यू यासारख्या कारचे कलेक्शन आहे.