या क्रिकेटरनं मोजक्या मंडळींच्या साक्षीनं उरकलं होतं लग्न, आता १४ वर्षांनी संसारात आलं विघ्न

कोण आहे तो क्रिकेटर? ज्यानं जगजाहीर केली बायकोपासून वेगळ झाल्याची गोष्ट

क्रिकेटर्स अन् फिल्डबाहेरील त्यांच्या प्रेमाचा खेळ हा नेहमीच हॉट टॉपिक राहिला आहे. सध्याच्या घडीला अनेक क्रिकेटर्स पत्नीपासून विभक्त झाल्याचा सीन दिसून आला. त्यात आता आणखी एका क्रिकेटरची भर पडलीये.

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल आणि विरेंद्र सेहवाग यांच्या घटस्फोटासंदर्भातील गोष्टी चर्चेत असताना या रांगेत आता लोकप्रिय फॉरेनर क्रिकेटरचं नावही सामील झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा ४० वर्षीय क्रिकेटर जेपी ड्युमिनी याने १४ वर्षांचा आपला संसार मोडल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर त्याने यासंदर्भातील माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

जेपी आणि सू या जोडीनं २०११ मध्ये एकमेकांसोबत लग्न केले होते. या जोडीला दोन मुलीही आहेत.

दोघांनी ३०० मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित लग्न केले होते. भारतीय संघाचा विद्यमान बॉलिंग कोच मोर्न मॉर्कल याच्यासह मार्क बाउचर आणि ग्रॅहम स्मिथ सारखे दिग्गज क्रिकेटरही उपस्थितीत होते.

ही जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेमाची उधळण करताना दिसायचे. पोस्ट दिसायच्या बंद झाल्यावर दोघांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगू लागली होती.

अखेर दोघांनी यावरील मौन सोडत विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. नवरा-बायको हे नातं संपलं असलं तरी मित्रत्वाचं नातं जपू असंही त्यांनी म्हटलं आहे.

एकमेकांसोबत घालवलेला वेळ अविस्मरणीय होता, असा उल्लेखही क्रिकेटरनं आपल्या पोस्टमध्ये केल्याचे दिसून येते.