Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिसरूडही फुटलं नव्हतं, पण कसोटीत केलं होतं पदार्पण; जाणून घ्या कोण कितव्या वर्षी उतरलं मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 15:15 IST

Open in App
1 / 11

१८ वर्षी वे १२६ दिवसांत अहमदने महान इंग्लिश कर्णधार ब्रायन क्लोज यांना मागे टाकले. त्यांनी १९४९ मध्ये १८ वर्षे आणि १४९ दिवसांचे असताना कसोटीत पदार्पण केले होते. इंग्लंडमधील सर्वात तरुण कसोटी पदार्पण करणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूचा मान होली कोल्विनच्या नावावर आहे. तिने २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले तेव्हा ती अवघ्या १५ वर्षे आणि ३३६ दिवसांची होती.

2 / 11

सचिन तेंडुलकरच्या नावावर भारतासाठी सर्वात तरुण कसोटी क्रिकेटपटू होण्याचा विक्रम आहे. सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १६ वर्षे व २०५ दिवसांच्या वयात पदार्पण केले होते.

3 / 11

ऑस्ट्रेलियासाठी इयान क्रेगच्या नावावर सर्वात तरुण कसोटी क्रिकेटर होण्याचा विक्रम आहे. क्रेगने १९५३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून वयाच्या १७ वर्षी आणि २३९ दिवसांत पदार्पण केले होते.

4 / 11

पाकिस्तानसाठी सर्वात तरुण कसोटी क्रिकेटर होण्याचा विक्रम हझान रझाच्या नावावर आहे. रझाने १९९६ मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यातून वयाच्या १४ वर्षी आणि २२७ दिवसात पदार्पण केले होते.

5 / 11

न्यूझीलंडसाठी डॅनियल व्हिटोरीच्या नावावर सर्वात तरुण कसोटी क्रिकेटपटू होण्याचा विक्रम आहे. व्हिटोरीने १९९७ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १८ वर्षे व १० दिवसांच्या वयात पदार्पण केले होते.

6 / 11

दक्षिण आफ्रिकेसाठी पॉल अॅडम्सच्या नावावर सर्वात तरुण कसोटी क्रिकेटर होण्याचा विक्रम आहे. अॅडम्सने १९९५ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १८ वर्षे आणि ३४० दिवसांच्या वयात पदार्पण केले होते.

7 / 11

वेस्ट इंडिजसाठी, जेम्स एडवर्ड सीलीच्या नावावर सर्वात तरुण कसोटी क्रिकेटपटू होण्याचा विक्रम आहे. सीलीने १९३० मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १७ वर्षे व १२२ दिवसांच्या वयात पदार्पण केले होते.

8 / 11

श्रीलंकेसाठी, संजीव विरासिंघेच्या नावावर सर्वात तरुण कसोटी क्रिकेटपटू होण्याचा विक्रम आहे. १९८५ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यातून वीरसिंघेने वयाच्या १७ वर्षे आणि १८९ दिवसांमध्ये पदार्पण केले होते.

9 / 11

बांगलादेशसाठी, मोहम्मद शरीफ यांच्या नावावर सर्वात तरुण कसोटी क्रिकेटपटू होण्याचा विक्रम आहे. शरीफने 2001 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात वयाच्या 15 वर्षे आणि 128 दिवसांच्या कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

10 / 11

झिम्बाब्वेसाठी हॅमिल्टन मसाकादझा याच्या नावावर सर्वात तरुण कसोटी क्रिकेटपटू होण्याचा विक्रम आहे. मसाकादझाने 2001 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 17 वर्षे आणि 352 दिवसांच्या वयात पदार्पण केले होते.

11 / 11

अफगाणिस्तानसाठी, मुजीब उर रहमानच्या नावावर सर्वात तरुण कसोटी क्रिकेटर होण्याचा विक्रम आहे. मुजीबने 2018 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात वयाच्या 17 वर्षे आणि 78 दिवसांत कसोटी पदार्पण केले.

टॅग्स :सचिन तेंडुलकरभारतइंग्लंड
Open in App